आसाममध्ये ‘उल्फा’चे भरती रॅकेट उद्ध्वस्त

गुवाहाटी – आसामच्या चराईदेव आणि दिब्रुगड जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि आसाम पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत ‘युनायटेड लिब्रेशन फ्रंट ऑफ आसाम-इंडिपेडंट’चे (उल्फाच्या-आय) भरती रॅकेट उद्वस्थ करण्यात आले. येथून एका अल्पवयीन मुलाची सुटका केली आहे. तसेच शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत. गेल्या महिन्यात याच चराईदेव जिल्ह्यातून उल्फाच्या पाच बंडखोरांना शस्त्रास्त्रांसह अटक करण्यात आली होती.

चराईदेव आणि दिब्रुगड जिल्ह्यातील गावांमध्ये उल्फा संघटना सक्रिय असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानंतर आसामच्या पोलिसांनी सुरक्षा दलासह शोध मोहीम सुरू केली. यामध्ये उल्फा संघटनेचा हार्डकोर कॅडर आणि चार ‘ओव्हर ग्राउंड वर्कर्स’ (ओजीडब्ल्यू) यांना ताब्यात घेण्यात आले. एसएस प्रा. बलदेव तेली, एक उल्फा (आय) कॅडर आणि अमित बारा, सुमित बेग, आझाद गोहरान आणि विजय अशी अटक करण्यात आलेल्या उल्फा बंडखोरांची नावे आहेत.

तसेच ही संघटनेकडून दिब्रुगडमध्ये अल्पवयीन मुलांच्या भरतीचे रॅकेट चालवित जात होते, हे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली आहे. यात एका अल्पवयीन मुलाची सुटका करण्यात आली आहे. या मुलाला समुपदेशनानंतर त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या उल्फा बंडखोरांना आसाम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

leave a reply