चीनमधील कोरोनाच्या साथीबाबत नोव्हेंबर २०१९ मध्येच अमेरिकी यंत्रणांना इशारा दिला होता

- लोकशाहीवादी कार्यकर्ते व लेखक वे जिंगशेंग यांचा दावा

नोव्हेंबर २०१९वॉशिंग्टन/बीजिंग – चीनमध्ये आलेल्या कोरोनाच्या साथीबाबत अमेरिकी यंत्रणांना नोव्हेंबर २०१९ मध्येच इशारा दिला होता, असा दावा वे जिंगशेंग यांनी केला आहे. चीनमधील लोकशाहीवादी चळवळीचे प्रमुख असलेले जिंगशेंग १९९७ साली अमेरिकेत दाखल झाले होते. ऑस्ट्रेलियातील ‘स्काय न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत जिंगशेंग यांनी, ऑक्टोबर २०१९मध्ये वुहानमध्ये पार पडलेल्या ‘वर्ल्ड मिलिटरी गेम्स’च्या पार्श्‍वभूमीवर आपल्याला नव्या साथीची माहिती मिळाली होती, असाही दावा केला आहे.

ऑस्ट्रेलियातील वृत्तवाहिनीने ‘व्हॉट रिअली हॅप्पन्ड् इन वुहान?’ नावाचा एक माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटासाठी वे जिंगशेंग यांची मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीत जिंगशेंग यांनी कोरोनाच्या दाव्यांबाबत खुलासा केला आहे. ‘मी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा, तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळचे एक नेते तसेच चिनी मानवाधिकार कार्यकर्ते दिमॉन लिऊ यांना कोरोनाच्या साथीबाबत सावध केले होते. आपण शक्य तितकी जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला. पण अमेरिकी यंत्रणांनी माहिती गांभीर्याने घेतली नाही’, असे जिंगशेंग म्हणाले. मात्र या अमेरिकी नेत्याचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे.

नोव्हेंबर २०१९चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने नक्की कोणत्या मार्गाने विषाणू सोडला आहे, याची त्यावेळी माहिती नव्हती. त्यामुळे मला अतिशय चिंता वाटत होती. विषाणूचा मुकाबला करण्यास पाश्‍चात्य देश तयार नाहीत, असे मला वाटत होते’, असेही जिंगशेंग यांनी पुढे स्पष्ट केले. मला बीजिंगमधल्या माझ्या सूत्रांकडून साथीबाबत माहिती मिळाली होती, असा दावाही त्यांनी केला. अमेरिकेचे माजी अधिकारी डेव्हिड आशर यांनी, ‘जिंगशेंग यांच्या इशार्‍यातून मिळालेली संधी म्हणजे ९/११चा हल्ला होण्यापासून थांबविण्यासारखा पर्याय होता’, अशा शब्दात प्रतिक्रिया नोंदविली आहे.

जिंगशेंग यांचा दावा समोर येत असतानाच, अमेरिकेतील दोन संसद सदस्यांनी प्रतिनिधीगृहात नवे विधेयक दाखल केले आहे. ‘द वर्ल्ड डिझर्व्हज् टू नो ऍक्ट’ असे या विधेयकाचे नाव आहे. कोरोना साथीच्या मुळासंदर्भात ठाम व निश्‍चित अशी माहिती मिळायला हवी, अशी मागणी या विधेयकात करण्यात आली आहे. वुहानमधील नोव्हेंबर २०१९कोरोनासंदर्भात शोधकार्यात अडथळा आणणार्‍या चिनी अधिकार्‍यांवर निर्बंध टाकण्याची शिफारसही यात करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाचे संसद सदस्य एलिस स्टेफानिक व रॉब विटमन यांनी हे विधेयक सादर केले आहे.

दरम्यान, चीनमध्ये कोरोना साथीच्या उद्रेकाची व्याप्ती वाढत असल्याची माहिती समोर येत आहेे. गेल्या आठवड्यात फुजिआन प्रांतात सुरू झालेल्या उद्रेकातील रुग्णांची संख्या १५०च्या वर गेल्याची माहिती समोर येत आहे. त्याचवेळी या प्रांतातील तीन शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरल्याचेही उघड झाले आहे. त्यात पुतिअन, क्वानझोउ व शिआमेन या शहरांचा समावेश आहे. या संसर्गामागे ‘डेल्टा व्हेरिअंट’ कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले असून शाळेतील विद्यार्थ्यांमधून साथ पसरल्याचे समोर आले आहे. फुजिआनपाठोपाठ युनान, ग्वांगडॉंग, शांघाय, सिचुआन, झेजिआंग व शान्डॉंगमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळल्याची माहिती ‘चायना डेलि’ या वेबसाईटने दिली आहे.

leave a reply