अमेरिका व दक्षिण कोरियामध्ये पुढील महिन्यापासून व्यापक युद्धसरावाला सुरुवात

-उत्तर कोरियाकडून धमकी

widespread-exercisesसेऊल – ऑगस्ट महिन्यापासून अमेरिकेबरोबर व्यापक युद्धसरावाला सुरुवात होईल, अशी घोषणा दक्षिण कोरियाचे संरक्षणमंत्री ली जाँग सूप यांनी केली. ‘उल्चि फ्रिडम शिल्ड’ नावाचा हा सराव 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या काळात पार पडेल, अशी माहिती संरक्षणमंत्री सूप यांनी दिली. गेली चार वर्षे अमेरिका व दक्षिण कोरियामधील व्यापक युद्धसराव रोखण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर ही घोषणा महत्त्वाची ठरते. दक्षिण कोरियाच्या या घोषणेवर उत्तर कोरियाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. अमेरिका व दक्षिण कोरियाने युद्धसरावासह इतर संरक्षण सहकार्य थांबविले नाही तर त्यांना अभूतपूर्व संकटांना तोंड द्यावे लागेल, अशी धमकी उत्तर कोरियाचे नेते चोए जिन यांनी दिली.

Members-South-Koreaगेल्या सहा महिन्यांमध्ये उत्तर कोरियाने लघु, मध्यम तसेच दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याचा सपाटा लावला आहे. यामुळे कोरियन क्षेत्रात तणाव निर्माण झाला असून जपान व दक्षिण कोरियाचे लष्कर अलर्टवर आहे. उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचण्यांच्या विरोधात गेल्या आठवड्यात अमेरिकेने मोठी घोषणा केली. यानुसार अमेरिकेच्या हवाईदलातील ‘एफ-35ए’ ही स्टेल्थ श्रेणीतील लढाऊ विमाने दक्षिण कोरियात तैनात होतील, असे अमेरिकेच्या माध्यमांनी म्हटले होते.

Us-South-Koreaदक्षिण कोरियन राष्ट्राध्यक्ष युन सूक-येओल अमेरिकेबरोबरचे लष्करी सहाय्य वृद्धिंगत करण्यासाठी उत्सूक आहेत. त्याचबरोबर कोरियन क्षेत्रातील अमेरिका व दक्षिण कोरियाच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन वाढविण्याचा प्रस्तावही त्यांनी दिला होता. त्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेची सहा एफ-35 विमाने दक्षिण कोरियात दाखल झाली होती. या तैनातीने भडकलेल्या उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी करून दक्षिण कोरियाला इशारा दिला होता.

US-South-Korea-excerciseत्यानंतर आता व्यापक युद्धसरावांबाबत झालेली घोषणा लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. दक्षिण कोरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मून जेइन यांनी 2019 साली अमेरिकेबरोबरील व्यापक युद्धसराव थांबविण्याची घोषणा केली होती. उत्तर कोरियाबरोबरील शांतीचर्चा पुन्हा सुरू होण्यासाठी उचलण्यात आलेल्या पवलांपैकी ते एक पाऊल होते, असे मानले जाते.

leave a reply