अमेरिका व पाश्‍चात्य देश विश्‍वासार्ह भागीदार राहिलेले नाहीत

- रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को/वॉशिंग्टन – पूर्व युरोपात नाटोचा विस्तार थांबवावा, यासाठी दिलेल्या प्रस्तावावर करार होण्याची शक्यता अगदीच कमी आहे असे सांगून अमेरिकेसह पाश्‍चात्य देश आता विश्‍वासार्ह राहिले नसल्याचा आरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला. युरोपमधील तणाव कमी करण्यासाठी रशियाने पाश्‍चात्य देशांबरोबर ‘सिक्युरिटी पॅक्ट’ अर्थात सुरक्षाविषयक कराराची तयारी दाखविली आहे. त्यासाठी गेल्या शतकातील ‘सोव्हिएत संघराज्या’चा भाग असलेल्या देशांना सदस्य बनविण्यापासून नाटोने दूर रहावे, अशी मागणी रशियाने केली होती. मात्र अमेरिका व नाटोने रशियन मागण्या फेटाळल्या असून त्यावर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमेरिका व पाश्‍चात्य देश विश्‍वासार्ह भागीदार राहिलेले नाहीत - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिनरशियाने युक्रेनच्या सीमेनजिक जवळपास एक लाख जवान तैनात केल्याचे दावे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहेत. या दाव्यांबरोबरच रशियाच्या लष्करी हालचालींची माहिती देणारे फोटोग्राफ्स प्रसिद्ध झाले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमणाची जय्यत तयारी केल्याचे इशारे युक्रेन तसेच पाश्‍चात्य देशांमधील अधिकारी व विश्‍लेषक देत आहेत. यापूर्वी २०१४ सालीही रशियाने अशाच प्रकारे सैन्यतैनाती वाढवून अचानक हल्ला चढविला होता, याची आठवणही करून देण्यात आली आहे.

यावरून पाश्‍चात्य देशांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला असून रशियाला गंभीर परिणामांची जाणीव करून देण्यात आली आहे. अमेरिका व पाश्‍चात्य देश विश्‍वासार्ह भागीदार राहिलेले नाहीत - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिनरशिया व पाश्‍चात्य देशांमध्ये सातत्याने शाब्दिक चकमकी झडत असून दोन्ही बाजू परस्परांना इशारे-प्रतिइशारे देत आहे. रशियन राष्ट्राध्यक्षांचे वक्तव्य याचाच भाग दिसत आहे. काही दिवसांपूर्वी रशियाने अमेरिका व नाटोला एक प्रस्ताव दिला होता. त्यात, नाटोच्या सदस्यत्वावरील मर्यादांसह पूर्व व मध्य युरोपातील लष्करी तैनाती मागे घेणे आणि रशियन सीमेजवळील युद्धसराव थांबवणे यासारख्या मागण्यांचा समावेश होता. नाटोने या मागण्या मान्य करण्याचे स्पष्ट शब्दात फेटाळले होते. तर अमेरिकेने रशियाशी चर्चा करण्याची तयारी असल्याचे संकेत दिले होते.

अमेरिका व पाश्‍चात्य देश विश्‍वासार्ह भागीदार राहिलेले नाहीत - रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिनयावर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘रशियाला दीर्घकालिन हमी हवी आहे. पण आपल्याला सर्वांना हे माहिती आहे की त्यांच्यावर विश्‍वास टाकता येणार नाही. एखाद्या आंतरराष्ट्रीय करारात रस उरला नाही तर अमेरिका त्यातून बाहेर पडते, हे आपण पाहिले आहे. वेगवेगळी कारणे पुढे करून आपल्या भूमीपासून हजारो किलोमीटर अंतरावर असणार्‍या भागात अमेरिका कारवाई करते. संयुक्त राष्ट्रसंघटनेचे ठराव व आंतरराष्ट्रीय कायदेही धाब्यावर बसविले जातात’, अशा शब्दात रशियन राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेला लक्ष्य केले. शीतयुद्धात मिळालेल्या विजयाने हर्षवायू झालेल्या पाश्‍चात्यांनी नाटोच्या विस्ताराला वेग दिला, असा दावाही पुतिन यांनी यावेळी केला. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी, अमेरिका विविध राजनैतिक माध्यमातून रशियाशी चर्चा करायला तयार असल्याचे म्हटले आहे. रशियाचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोव्ह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सुलिवन यांनी ही माहिती दिली. या चर्चेत रशियाच्या हालचालींबाबत पाश्‍चात्य देशांना वाटणार्‍या चिंतेचाही समावेश हवा, असे सुलिवन यांनी सांगितले आहे.

leave a reply