भारताबरोबरील संरक्षणविषयक भागीदारी व्यापक करण्यासाठी अमेरिकेच्या हालचाली

वॉशिंग्टन – रशियाकडून एस-400 हवाई सुरक्षा यंत्रणेची खरेदी करणाऱ्या भारताला निर्बंधांमधून सवलत देणारे सुधारणा विधेयक अमेरिकेच्या संसदेने नुकतेच मंजूर केले होते. त्यानंतर आता अमेरिकन सिनेटच्या आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीने भारताबरोबरील संरक्षणविषयक भागीदारी नव्या उंचीवर नेण्याची तयारी केली आहे. यानुसार गोपनीय माहितीचे आदानप्रदान, ड्रोन्स व चौथ्या आणि पाचव्या श्रेणीतील लढाऊ विमानांच्या निर्मितीबाबत अमेरिका भारताशी सहकार्य करणार आहे.

Defence-partnershipरशियाकडून हवाई सुरक्षा यंत्रणेची खरेदी करणाऱ्या तुर्कीवर अमेरिकेने निर्बंध लादले होते. मात्र रशियाकडून ही यंत्रणा खरेदी करणाऱ्या भारताला मात्र अमेरिकेने निर्बंधांमधून सवलत दिली. याबाबतचे सुधारणा विधेयक काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या संसदेने मंजूर केले. आता अमेरिकेच्या संरक्षणविषयक धोरणावर प्रभाव टाकणाऱ्या सिनेटच्याआर्म्ड सर्व्हिसेस कमिटीने भारताशी संरक्षणविषयक भागीदारी अधिकच व्यापक करण्यासाठी पावले उचलली आहेत. गोपनीय माहितीबाबतचे सहकार्य तसेच ड्रोन्स आणि चौथ्या व पाचव्या श्रेणीतील लढाऊ विमानांसंदर्भात अमेरिका भारताशी सहकार्य वाढविण्यास उत्सुक आहे. आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीने यासंदर्भात बोलताना भारताबरोबरील संरक्षणविषयक भागीदारीचे महत्त्व अधेोरेखित केले.

अमेरिका भारताबरोबर शस्त्रास्त्रे व संरक्षणसाहित्याचे संयुक्तरित्या संशोधन आणि विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीने म्हटले आहे. यामध्ये 5जी तंत्रज्ञान आणि ‘ओपन रेडिओ ॲक्सेस नेटवर्क’चा (आरएएन); सायबर तसे अतीशीत प्रदेशातही कार्यान्वित राहणाऱ्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

senate-defence-partnershipयाच्या बरोरीने आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीने भारताबरोबरील संरक्षणविषयक सहकार्य वाढविण्यासाठी वेगवेगळ्या आघाड्यांवर विचार करण्याची सूचना संरक्षणमंत्र्यांना दिली. तसेच संरक्षणविषयक संशोधन व बुद्धिसंपदेचे संरक्षण करण्यासंदर्भातील तरतुदींचा समावेश भारताबरोबरील सहकार्यात करण्यातआलेला आहे. अमेरिकेतील खाजगी क्षेत्राला भारताच्या संरक्षण मंत्रालयाबरोबर सहकार्य करण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधी लक्षात घ्या व त्यावर काम करा, अशी सूचनाही आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीने संरक्षणमंत्री ऑस्टिन लॉईड यांना दिल्या आहेत.

दरम्यान, भारत आपल्या विमानवाहू युद्धनौकेसाठी अमेरिकन बनावटीच्या ‘एफ-18/ए हॉर्नेट’ लढाऊ विमानांचा विचार करीत आहे. भारतात या विमानाच्या चाचण्या पार पडल्या असून भारतीय नौदलाच्या आवश्यकतेनुसार या विमानांची निर्मिती करणाऱ्या बोईंग कंपनीन आपल्या विमानात फेरबदल केले आहेत. तसेच या विमानांसाठी बोईंगने भारताला जबरदस्त ऑफर दिल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीने भारताबरोबरी संरक्षणविषयक सहकार्य दृढ करण्यासाठी उचललेली पावले लक्ष वेधून घेत आहेत.

leave a reply