अमेरिका रशियावर मारा करू शकणारी शस्त्रे युक्रेनला पुरविणार नाही

- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा खुलासा

रशियावर मारावॉशिंग्टन/मॉस्को – रशियावर मारा करू शकणाऱ्या ‘मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टीम्स्‌‍-एमएलआरएस’ युक्रेनला पुरविण्यात येणार नाहीत, असे अमेरिकेने जाहीर केले. तशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना करावी लागली. कारण युक्रेनने अमेरिकेकडे ‘एमएलआरएस’ची मागणी केली होती. त्यावर अमेरिका हालचाली करीत असल्याचे उघड झाल्यानंतर रशियाने त्यावर थरकाप उडविणारा इशारा दिला होता. ही कारवाई ‘रेड लाईन’ क्रॉस करणारी ठरेल व त्याविरोधात योग्य ती कारवाई करील, असे रशियाने बजावले हेोते.

मारिओपोलनंतर रशियन सैन्य युक्रेनच्या इतर महत्त्वाच्या शहरांचा ताबा घेण्याच्या तयारी आहे. युक्रेनी लष्कराचा प्रतिकार रशियाच्या आक्रमणासमोर तोकडा पडत आहे. अशा परिस्थितीत युक्रेनने रशियावर हल्ले चढविण्यासाठी अमेरिकेकडे एमएलआरएसची मागणी केली होती. अमेरिकेनेही त्याला प्रतिसाद देण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र रशियाने याची गंभीर दखल घेतली. अमेरिकेने तसा निर्णयघेतलाच, तर युक्रेन रशियन शहरांवर मारा करू शकेल. ही बाब रशियाच्या ‘रेड लाईन’चे उल्लंघन करणारी ठरेल, असा इशारा रशियाने दिला होता. यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी तातडीने यावर खुलासा दिला.

रशियावर मारारशियावर मारा करू शकणारी रॉकेट सिस्टीम युक्रेनला पुरविली जाणार नाही, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या निर्णयावर रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष व रशियाच्या सिक्युरिटी काऊन्सिलचे प्रमुख दिमित्री मेदवेदेव्ह यांनी समाधान व्यक्त केले. हा निर्णय योग्य ठरतो. कारण अमेरिकेने युक्रेनला एमएलआरएस पुरविली असती, तर रशियन शहरांवर हल्ले झाले असते. रशियाने आपल्या शहरांवर असे हल्ले चढविण्याचे निर्णय जिथे झाले, त्या ठिकाणांना नष्ट केले असते. यातली काही ठिकाणे युक्रेनची राजधानी किव्हच्या बाहेर आहेत, अशा सूचक शब्दात मेदवेदेव्ह यांनी रशियाची भूमिका मांडली.

रशियन शहरांवर हल्ले चढविणारी यंत्रणा युक्रेनला पुरवून अमेरिका सुरक्षित राहू शकली नसती, हे मेदवेदेव् यांनी नेमक्या शब्दात मांडल्याचे दिसत आहे. मात्र हा निर्णय घेणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर काहीजणांनी सडकून टीका केली. अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा युक्रेनला एमएलआरएस न पुरविण्याचा निर्णय निराश करणारा असल्याची खंत व्यक्त केली.

आजच्या घडीला रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना रोखणे सर्वात महत्त्वाचे ठरते, असे सांगून सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी यासाठी युक्रेनला एमएलआरएसचा पुरवठा करणे आवश्यक होते, असा दावा केला. मात्र बायडेन प्रशासनातील काहीजण असा निर्णयघेतला तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष त्याकडे चिथावणीखोर कारवाई म्हणून पाहतील, या चिंतेने ग्रासले होते, असा टोला ग्राहम यांनी लगावलाआहे. याआधीही बायडेन प्रशासनाने युक्रेनला रशियाविरोधात सहाय्य पुरविण्याचा निर्णयघेतला, तरी युक्रेनच्या भूमीवर रशियाबरोबरथेट संघर्ष पुकारण्यास आपण तयार नसल्याचे म्हटले होते.

leave a reply