पुढील काळात रोख रकमेचा वापर घटणार

- बँक ऑफ इंग्लंडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावा

लंडन – इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांमधील वाढ आणि मोठ्या ब्रँडस्‌‍कडून डिजिटल पेमेंटसाठी होणारा आग्रह, यामुळे नजिकच्या काळात रोख रकमेचा वापर घटेल, असा दावा ‘बँक ऑफ इंग्लंड’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. ब्रिटनमध्ये दररोज होणाऱ्या व्यवहारांमधील ८५ टक्क्यांहून अधिक व्यवहार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होत असल्याकडे ‘बँक ऑफ इंग्लंड’चे डेप्युटी गव्हर्नर सर जॉन कनलिफ यांनी लक्ष वेधले. रोख रकमेचा वापर कमी होत असल्याची जाणीव करून देतानाच ब्रिटनच्या सरकारने ‘डिजिटल पौंड’ विकसित करण्यासाठी वेगाने पावले उचलावीत, अशी मागणीही सर कनलिफ यांनी केली.

पुढील काळात रोख रकमेचा वापर घटणार - बँक ऑफ इंग्लंडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावाब्रिटनची राजधानी लंडनमध्ये ‘इनोव्हेट फायनान्स ग्लोबल समिट २०२३’ला सुरुवात झाली आहे. या परिषदेत बोलताना सर कनलिफ यांनी दैनंदिन व्यवहारातील रोख रकमेचा वापर कमी होत चालल्याची माहिती दिली. ‘ब्रिटनमध्ये १० पैकी ९ जण ‘कॉन्टॅक्टलेस पेमेंटस्‌‍’चा वापर करतात. एक तृतियांश नागरिकांकडून मोबाईल पेमेंटस्‌‍ ॲप्सना प्राधान्य दिले जाते. ब्रिटनच्या बहुतेक शहरांमधील मोठ्या दुकानांमध्ये कॅशलेस व्यवहारच होतात’, असे ‘बँक ऑल इंग्लंड’च्या डेप्युटी गव्हर्नरनी सांगितले. पुढील काळात रोख रकमेचा वापर घटणार - बँक ऑफ इंग्लंडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावादैनंदिन जीवनातील डिजिटायझेशनची प्रक्रिया अधिकाधिक वेगवान होऊ लागली असल्याचेही सर कनलिफ यांनी यावेळी अधोरेखित केले.

व्यवहारांमध्ये रोख रकमेचा उपयोग करणारे अल्पसंख्य असले तरी त्याची मागणी असेपर्यंत मध्यवर्ती बँकेकडून कॅशचा वापर कायम राहिल, असे संकेतही ‘बँक ऑल इंग्लंड’च्या अधिकाऱ्यांनी दिले. दोन वर्षांपूर्वी ‘बँक ऑफ इंग्लंड’च्या पेमेंटस्‌‍ विभागाच्या संचालिका व्हिक्टोरिया क्लेलँड यांनी, कॅश अर्थात रोख रकमेचे वर्चस्व संपल्याचा दावा केला होता. २०२८ सालापर्यंत एकूण व्यवहारांपेकी केवळ नऊ टक्के व्यवहारांमध्ये रोख रकमेचा वापर होईल, असे भाकितही त्यांनी केले होते.

पुढील काळात रोख रकमेचा वापर घटणार - बँक ऑफ इंग्लंडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावागेल्या काही वर्षांपासून युरोप खंडातील देशांमध्ये रोख रकमेचा वापर कमी होत असून अनेक देशांमध्ये ‘कॅशलेस सोसायटी’ संकल्पनेला प्रोत्साहन देण्यात येत आहे. स्वीडन व नॉर्वे यासारख्या देशांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक व्यवहार डिजिटल माध्यमांमधून करण्यात येतात. नेदरलॅण्डस्‌‍ व फिनलँडमध्येही ‘कॅशलेस’ व्यवहारांचे प्रमाण मोठे असून २०३० सालापर्यंत बहुतांश व्यवहारांमध्ये रोख रकमेचा वापर बंद झालेला असेल, असे संकेत देण्यात येत आहेत. युरोपिय महासंघाच्या सदस्य देशांमध्येही रोख रकमेच्या व्यवहारांचे प्रमाण ६० टक्क्यांखाली आल्याचे गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या अहवालात उघड झाले होते.

हिंदी

 

leave a reply