झेलेन्स्की अमेरिकेला तिसऱ्या महायुद्धात खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत

अमेरिकी विश्लेषक टकर कार्लसन यांचा आरोप

Zelenskyवॉशिंग्टन/किव्ह – ‘पोलंडमध्ये झालेल्या क्षेपणास्त्राच्या हल्ल्यावरून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की खोटे बोलत आहेत. अमेरिकेने तिसऱ्या महायुद्धात सामील व्हावे यासाठी झेलेन्स्की यांच्याकडून हे प्रयत्न सुरू आहेत’, असा आरोप अमेरिकी वृत्तनिवेदक व विश्लेषक टकर कार्लसन यांनी केला. झेलेन्स्की यांच्या भूमिकेमुळे पुढील काळात त्यांना समर्थन द्यायचे की नाही याचा निर्णय अमेरिकेला घ्यावा लागेल, असा सल्लाही कार्लसन यांनी दिला. कार्लसन यांचे वक्तव्य समोर येत असतानाच नजिकच्या काळात युक्रेनला करण्यात येणाऱ्या शस्त्रपुरवठ्यात अमेरिकेकडून घट होण्याचे संकेत ‘सीएनएन’ या वृत्तवहिनीने दिले आहेत.

War Rages मंगळवारी पोलंडमध्ये झालेल्या क्षेपणास्त्राच्या हल्ल्याचे पडसाद अजूनही उमटत असून युक्रेन व त्याला समर्थन देणाऱ्या पाश्चिमात्य देशांमधील मतभेद ऐरणीवर आले आहेत. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पोलंडमध्ये पडलेले क्षेपणास्त्र युक्रेनी संरक्षणदलांकडून सोडण्यात आल्याचे मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यांच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे अमेरिकेसह इतर युरोपिय देशांमध्ये नाराजी असून ही नाराजी उघडपणे वर येत आहे. अमेरिकेतही प्रसारमाध्यमे, विश्लेषक तसेच राजकीत वर्तुळात युक्रेनला करण्यात येणाऱ्या समर्थनावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. टकर कार्लसन यांचे वक्तव्य त्याचाच भाग आहे. अमेरिकेतील आघाडीची वृत्तवाहिनी ‘फॉक्स न्यूज’वर कार्यरत असणाऱ्या कार्लसन यांनी, झेलेन्स्की यांच्यावर अमेरिकेला तिसऱ्या महायुद्धात खेचण्याचा ठपका ठेवला. झेलेन्स्की यांच्याकडून करण्यात येणारी वक्तव्ये चुकीची असून त्यामुळे लाखो अमेरिकन्सचे जीव जाऊ शकतात, असा दावा त्यांनी केला. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जाणुनबुजून अमेरिकेला युद्धात सामील करण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यांना सहाय्य करायचे की नाही याचा निर्णय लवकरच घ्यावा लागेल, असेही कार्लसन म्हणाले. झेलेन्स्की पूर्व युरोपातील इतर भ्रष्ट नेत्यांप्रमाणेच US-into-World-War-IIIअसू शकतात, असा आरोपही फॉक्स न्यूजच्या वृत्तनिवेदकांनी केला आहे. दोन दिवसांपूर्वीच रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्रि मेदवेदेव्ह यांनी पोलंडची घटना तिसऱ्या महायुद्धासाठी कारणीभूत ठरु शकते असा गंभीर इशारा दिला होता. त्यापूर्वी मंगळवारी पोलंडमध्ये क्षेपणास्त्र हल्ला झाल्यावर युक्रेन व पोलंड हे देश रशिया आणि नाटोमध्ये संघर्षाचा भडका उडावा यासाठी चिथावणी देत असल्याचा आरोपही रशियाने केला होता. पोलंडमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सुरुवातीच्या काही तासांमध्ये युक्रेन तसेच पोलंडच्या नेत्यांकडून तसेच अधिकाऱ्यांकडून आक्रमक वक्तव्ये करण्यात आली होती. युक्रेनने रशियावर आरोपांची राळ उडवून नाटोने रशियाला प्रत्युत्तर देण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी केली होती. नाटोचा सदस्य देश असलेल्या पोलंडनेही नाटोच्या घटनेनुसार ‘आर्टिकल फोर’ अंतर्गत क्षेपणास्त्र हल्ल्याच्या प्रकरणावर चर्चा व्हावी, अशी आग्रही भूमिका घेतली. पोलंडसह पूर्व युरोपातील काही देशांनी आपल्या संरक्षणदलांना अलर्टवर राहण्याचे आदेश जारी केले होते.

leave a reply