सिरियातील इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये 11 जण ठार

- हिजबुल्लाहच्या शस्त्रास्त्राचे कोठार लक्ष्य

दमास्कस – इस्रायलच्या लढाऊ विमानांनी लेबेनॉनच्या हद्दीतून सिरियात चढविलेल्या हल्ल्यांमध्ये 11 जण ठार झाले. सिरियाच्या होम्स प्रांतातील हिजबुल्लाहच्या शस्त्रास्त्रांच्या गोदामावर हे हल्ले झाल्याची माहिती मानवाधिकार संघटनेने दिली. यामध्ये इराणसंलग्न संघटनेच्या दहशतवाद्यांचा समावेश असल्याचा दावा या संघटनेने केला.

सिरियातील इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये 11 जण ठार - हिजबुल्लाहच्या शस्त्रास्त्राचे गोदाम लक्ष्यब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेचे सिरियातील प्रमुख रामी अब्दुल रहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सात सिरियन जवान आणि चार इराणसंलग्न दहशतवादी ठार झाले. होम्समधील ‘खिरबेत अल-तीन’ या गावाजवळ हे हल्ले झाले. सिरियन लष्कराच्या सूत्रांनी देखील होम्समधील या हल्ल्याची माहिती दिली.

इस्रायलच्या लढाऊ विमानांनी लेबेनॉनच्या हद्दीत घुसखोरी करून हल्ले चढविले. आपल्या हवाई सुरक्षा यंत्रणेने इस्रायलची काही क्षेपणास्त्रे यशस्वीरित्या भेदल्याचा दावा सिरियन लष्कराच्या सूत्रांनी केला. त्याचबरोबर इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये सिरियन नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप लष्कराच्या सूत्रांनी केला आहे. पण परदेशी माध्यमांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करणार्‍या इस्रायलच्या लष्कराने या आरोपांवर प्रतिक्रिया दिलेली नाही.सिरियातील इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये 11 जण ठार - हिजबुल्लाहच्या शस्त्रास्त्राचे गोदाम लक्ष्य

मात्र सिरियातील गृहयुद्धाच्या आडून इराण हिजबुल्लाह तसेच इस्रायलविरोधी दहशतवादी गटांना शस्त्रसज्ज करीत असल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. त्यामुळे इस्रायलच्या सुरक्षेसाठी धोका ठरणार्‍या या दहशतवादी संघटनांना शस्त्रसज्ज करण्याचे इराणचे प्रयत्न खपवून घेणार नसल्याचे इस्रायलने याआधीच बजावले होते.

सिरियातील शस्त्रास्त्रांची तस्करी आणि हिजबुल्लाहच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा इशारा इस्रायलने याआधी दिला होता. 2011 ते 2019 पर्यंत सिरियामध्ये किमान दोनशे हवाई हल्ले चढविल्याची माहिती इस्रायलच्या लष्कराने प्रसिद्ध केली होती. त्यानंतरच्या काळातही सिरियातील इराण व हिजबुल्लाहची ठिकाणे आणि तळ यांना आपण लक्ष्य केल्याचे संकेत इस्रायलने दिले होते. पण उघडपणे याची जबाबदारी इस्रायलने स्वीकारलेली नाही.

leave a reply