१ जूनपासून २०० ट्रेन्स धावणार

- रेल्वे मंत्र्यांची घोषणा

नवी दिल्ली – रेल्वेने येत्या १ जूनपासून देशभरात २०० विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी या संदर्भातली घोषणा केली. या २०० स्पेशल ट्रेन्स वेळापत्रकानुसार सोडल्या जाणार असून याचे ऑनलाइन बुकिंग लवकर सुरु होईल, अशी माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर बंद असलेली रेल्वे टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने जाहीर केला आहे. सोमवारी रात्री रेल्वेमंत्र्यांनी १ जूनपासून २०० विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचे जाहीर केल. या विशेष रेल्वे गाड्या नॉन एसी असतील. या गाड्याची संख्या हळूहळू वाढविण्यात येणार आहे. तसेच रेल्वे गाडयांसाठी ऑनलाइन तिकीट विक्री होईल.

सध्या विविध राज्यांमध्ये अडकलेले हे मजूर श्रमिक स्पेशल ट्रेन्समधून घरी जात आहेत. १ मे पासूून मजूरांसाठी चालविण्यात आलेल्या रेल्वे गाड्यांमधून २१ लाखांहून अधिक मजूर आपल्या गावी परतले आहे . रेल्वे मंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार रेल्वे मंत्रालय राज्य सरकारांसोबत केंद्रीय गृहमंत्रालयाशी समन्वय साधून ट्रेन चालविणार आहे. ज्या राज्यामधून मजूर घरी जाणार आहे, त्या राज्य सरकारांना नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे. या अधिकाऱ्यांना या सर्व मजूरांचे रजिस्ट्रेशन करून त्याची यादी रेल्वेला द्यावी लागेल. या यादीनुसार विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला जाईल. यामध्ये राज्य सरकारांना या मजूरांची स्टेशनवर पोहोचविण्याची व्यवस्था करावी असे आवाहन रेल्वे मंत्री गोयल यांनी केले आहे.

दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून मजूरांसाठी काही नियम जाहीर केले आहेत. प्रत्येक मजूरांची स्थानकात प्राथमिक तपासणी करण्यात येईल. तिकीटावर दिलेल्या सूचनांचे मजूरांना पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच मास्क परिधान करणे बंधनकारक असेल. कोरोनाची लक्षणे नसलेल्या मजूरांना प्रवासाला परवानगी देण्यात येईल.

leave a reply