बिहारमधील पूरात २१ जणांचा बळी

पाटणा – गेल्या काही दिवसांपासून बिहारमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती गंभीर बनली आहे. आत्तापर्यंत या पावसाने २१ जणांचा बळी घेतला असून बिहारमधील १६ जिल्ह्यातील ६९ लाख नागरिकांना याचा फटका बसला आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफने युध्दपातळीवर बचाव कार्य हाती घेतले आहे. दरम्यान या पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत दिली जात आहे.

बिहारमधील पूरात २१ जणांचा बळीराज्याच्या १६ जिल्ह्यातील ११८५ ग्रामपंचायतींना या पुराचा फटका बसला आहे. बिहारमधील सीतामढी, शिवहर, सुपौल, किशनगंज, दरभंगा, मुजफ्फरपुर, गोपालगंज, पूर्वी चम्पारण, पश्चिम चंपारण, खगडिया, सारण, समस्तीपुर, सिवान, मधुबनी, मधेपुरा आणि सहरसा या जिल्ह्यातील ६९ लाख नागरिक या पूराने प्रभावित झाले आहेत. तर पूरामुळे दरभंगा जिल्ह्यात ७ जण, मुजफ्फरपुरमध्ये ६, पश्चिम चंपारणमध्ये ४ आणि सिवान मध्ये प्रत्येकी दोघेजण दगावले आहेत.

बिहारमध्ये गंगा या प्रमुख नदीसह अधवारा समूह नदी, लखनदेई, रातो, मरहा, मनुसमारा, बागमती, कमला बलान, गंडक, बूढ़ी गंडक, कदाने, नून, वाया, सिकरहना, लालबेकिया, तिलावे, धनौती, मसान, कोशी, गंगा, कमला बलान, करेह या नद्यांना पूर आला आहे. गुरुवारी गंगेच्या पातळीत वाढ झाली असून पटणा शहरालाही या पूराचा फटका बसेल अशी परिस्थिती आहे. या नद्यांमध्ये पाण्याच्या पातळीत झालेल्या वाढीमध्ये नेपाळमध्ये सुरू असलेला पाऊस महत्वाचे कारण सांगितले जाते.

बिहारमधील पूरात २१ जणांचा बळीपूराचा फटका बसलेल्या भागात आठ शिबीरे सुरू करण्यात आली आहेत आणि या शिबिरात १२ हजारांहून अधिक जण राहत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. याशिवाय पूराचा फटका बसलेल्या भागात १४०२ सामुदायिक किचन सुरू करण्यात आली आहेत. या पूरग्रस्तांसाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांची ३३ टीम मदतकार्य करीत आहेत. आत्तापर्यंत चार लाखांहून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत दिली जात आहे. बिहार सरकारने आत्तापर्यंत साडेचार लाखांहून अधिक जणांना २७० कोटी रुपयांचे वाटप केले आहे.

leave a reply