मणिपूरमध्ये बंडखोरांच्या हल्ल्यात आसाम रायफलचे तीन जवान शहीद

- बंडखोरी संघटनेचा चीनशी संबंध असल्याचा दावा

चंदेल – चीनकडून शस्त्र आणि पैशाचा पुरवठा करण्यात येणाऱ्या मणिपूरमधील ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ या (पीएलए) बंडखोरी संघटनेने आसाम रायफल्सच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात तीन जवान शहीद झाले. तसेच या हल्ल्यात सहा जवान जखमी झाले आहेत. भारत आणि चीनमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्याकडे पहिले जात आहे. सीमेवरील वाढविलेल्या तणावानंतर चीन ईशान्य भारतातील बंडखोरी संघटनांच्या साहाय्याने येथे अशांतता माजविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे अहवाल आहेत. काही दिवसांपूर्वी थायलंडमध्ये चिनी बनावटीचा प्रचंड मोठा शस्त्रसाठा पकडण्यात आला होता. ही शस्त्रे भारतविरोधी कारवायांसाठी वापरली जाणार होती हे थायलंडमधील सुरक्षा यंत्रणांच्या तपासात उघड झाले होते. तसेच या प्रकरणात म्यानमारमध्ये सहा जणांना अटक करण्यात आली होती. यापार्श्वभूमीवर म्यानमार सीमेजवळ भारतीय जवानांवर झालेल्या या हल्ल्याचे गांभीर्य वाढले आहे.

MANIPURबुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास आसाम रायफल्सच्या जवानांचे पथक गस्तीनंतर म्यानमार सीमेलगत असलेल्या खोंगटाळ येथील छावणीत परतत असताना ‘पीएलए’च्या बंडखोरांनी घात लावून हल्ला केला. दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडून आणला. यानंतर दहशतवाद्यांनी जवानांवर बेछूट गोळीबार सुरु केला. या आत्मघातकी हल्ल्यात तीन जवान शहीद झाले. तर सहा जवान गंभीर जखमी झाले.

जवान आणि या हल्लेखोरांमध्ये बराच काळ चकमक सुरु होती. मात्र यानंतर हे दहशतवादी येथून निसटल्याचे वृत्त आहे. लष्कराने यानंतर या भागात मोठी शोधमोहीम हाती घेतली आहे. तसेच भारत-म्यानमार सीमेवर गस्त वाढविण्यात आली आहे.

‘पीएलए’ या संघटनेला चीनचे सहाय्य मिळते, अशी माहिती उघड होत आहे. १९७८ साली स्थापन झालेली ही संघटना स्वतंत्र सोशलिस्ट राज्याची मागणी करते. मात्र मणिपूरमधील नागा, कुकी आणि इतर समुदायाच्या बंडखोरी संघटनांशी ‘पीएलए’चा संबंध नाही. ‘पीएलए’च्या बंडखोरांना म्यानमारमधील दहशतवादी संघटनांच्या सहाय्यांने चीन प्रशक्षित देतो आणि ही संघटना चीनचा ईशान्य भारतातील चीनचे डोळे आणि कान असल्याच्या दावा केला जातो.

MANIPURगेल्या काही वर्षांत ईशान्य भारतात सुरक्षादलांनी जोरदार कारवाई करीत येथील बंडखोरी कारावया संपवीत आणल्या आहेत. म्यानमारच्या मदतीने कारवाई करीत सीमेपलीकडील बंडखोरी संघटनांचे तळ उद्वस्थ केले आहेत. उल्फा, नागा आणि कुकी संघटनांच्या नेत्यांनी शस्त्र खाली ठेऊन शांती प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. त्यामुळे ईशान्य भारतात हिंसाचार प्रचंड घटला आहे. मात्र पुन्हा ईशान्येकडील राज्यांना या हिंसाचारात ढकलण्यासाठी चीनकडून जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येते. गेल्या महिन्यात अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय सैनिकांवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या बंडखोरांना ठार करण्यात आले होते.

भारतविरोधी कारवायांसाठी म्यानमारमधील दहशतवादी गटांना चीन-पाकिस्तानचे सहाय्य करत असल्याचे समोर येत आहे. गेल्या महिन्यात थायलंडच्या सुरक्षा यंत्रणांनी मोठा शस्त्रसाठा पकडला होता. हा शस्त्रसाठा भारतविरोधी कारवायांसाठी वापरण्यात येणारा होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली होती. भारताकडून म्यानमारसह आग्नेय आशियाशी देशांशी कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत . त्याअंतर्गत भारतीय सीमेवर व म्यानमारमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामुळे भारताचा म्यानमारवरील प्रभाव वाढला आहे. त्यामुळे या प्रकल्पांना लक्ष करून भारतीय हितसंबंधांना लक्ष करण्यासाठी चीन म्यानमारमधील दहशतवादी संघटनांना सहाय्य करीत आहे. तसेच या संघटनांमार्फत भारतातील बंडखोरी संघटनांना सहाय्य देण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जातो.

leave a reply