सोमालियात ३३ भारतीय ओलीस  

ओलीसनवी दिल्ली –  सोमालियात  ३३ भारतीयांना ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली आहे. आठ महिन्यांपूर्वी हे ३३ जण इथल्या एका कंपनीत नोकरीला लागले होते. पण याच कंपनीने त्यांना ओलीस ठेवल्याचे  समोर आले आहे. या ३३ जणांच्या सुटकेसाठी केनियातील भारतीय दूतावासाद्वारे सोमालियन अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे, असे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी सांगितले.

या वर्षाच्या जानेवारी महिन्यात एकूण ३३ भारतीय सोमालियाची राजधानी मोगादिसू येथील ‘एसओएम स्टील लिमिटेड’ या कंपनीत नोकरीला लागले होते. यामध्ये उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील २५ जण, तसेच बिहारमधील सहा जण आणि पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधून प्रत्येकी एकाचा समावेश आहे.  सुरुवातीचे दोन महिने या कंपनीने कर्मचाऱ्यांशी चांगले वर्तन केले. तसेच त्यांचे वेतनही वेळेत दिले.  त्यानंतर या कामगारांचा छळ सुरू झाला. काही कामगारांनी त्याला विरोध केला. त्यानंतर कामगारांना वेतन मिळणे बंद झाले. कामगारांनी याबद्दल कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारल्यावर या सर्वांचा पासपोर्ट काढून घेण्यात आले.

ओलीस

शुक्रवारी परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी सोशल मिडीयावरून या ३३ कामगारांना ओलीस ठेवण्यात आल्याची माहिती दिली. परराष्ट्र मंत्रालय, केनिया आणि नैरोबी येथील भारतीय दूतावासातील अधिकारी या ३३ भारतीयांच्या सुटकेसाठी सोमालियन सरकारशी सातत्याने संपर्क साधत आहोत. तसेच  आम्ही भारतातील सोमालियन  दूतावासातील अधिकाऱ्यांशीही संपर्कात आहोत. “लवकरात लवकर या सर्वांची सुटका होईल, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

leave a reply