सिरियातील संघर्षात ३३८ दहशतवादी ठार

- रशियन लष्कराची माहिती

मॉस्को, दि. १३ (वृत्तसंस्था) – सिरियन लष्कराने गेल्या २० दिवसात केलेल्या कारवाईत ३३८ दहशतवाद्यांना ठार केले. सिरियन लष्कराची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे रशियन लष्कराचे म्हणणे आहे. दोन आठवड्यानंतर सिरियामध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूका होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर, सिरियन लष्कराने दहशतवादाविरोधात व्यापक कारवाई सुरू केल्याचे दिसते.

सिरियातील संघर्षात ३३८ दहशतवादी ठार - रशियन लष्कराची माहितीरशियन लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिरियन लष्कराने २३ एप्रिलपासून दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली होती. यामध्ये ३३८ दहशतवाद्यांचा खातमा केला तर ४४ दहशतवाद्यांना अटक झाली आहे. याशिवाय दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी तयार केलेली २० स्फोटके जप्त केली तर सहा जिवंत बॉम्ब निष्क्रिय केले. याशिवाय शस्त्रसाठाही मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला. लष्कराने यावेळी दहशतवाद्यांची ४५ ठिकाणे नष्ट केले. दहशतवाद्यांवरील या कारवाईसाठी सिरियामध्ये तैनात रशियन हवाईदलाने सिरियन लष्कराला साथ दिली.

सिरियातील संघर्षात ३३८ दहशतवादी ठार - रशियन लष्कराची माहितीसिरियामध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. २६ मे रोजी होणार्‍या या निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष अस्साद पुन्हा निवडणून येण्याची शक्यता वर्तविण्यात येते. या पार्श्‍वभूमीवर, सिरियामध्ये मोठ्या प्रमाणात हल्ले घडविण्याची योजना दहशतवाद्यांनी आखली आहे. यामध्ये सरकारी कार्यालयांना लक्ष्य करण्याचा कट दहशतवाद्यांनी आखला होता, अशी माहिती सिरियातील रशियन कमांडचे उपप्रमुख रेअर ऍडमिरल अलेक्झांडर कार्पोव्ह यांनी दिली.

या हल्ल्यांसाठी दहशतवादी ‘अल-तन्फ’ येथे लष्करी प्रशिक्षण घेत असल्याचे कार्पोव्ह यांनी सांगितले. सिरियाच्या पश्‍चिमेकडील होम्स प्रांत अस्साद राजवटीच्या नियंत्रणाखाली नाही. तर या प्रांतावर अमेरिकन लष्कराचे वर्चस्व असल्याचे कार्पोव्ह यांनी म्हणाले. होम्स प्रांतावरील नियंत्रण महत्वाचे मानले जाते. सिरियाच्या उत्तर आणि पश्‍चिमेकडील भागांना राजधानी दमास्कसशी जोडणारा मार्ग होम्स प्रांतातून जातो.सिरियातील संघर्षात ३३८ दहशतवादी ठार - रशियन लष्कराची माहिती

दरम्यान, रशियाने सिरियातील आपले नौदलतळ विस्तारण्याची घोषणा केली आहे. तार्तूस बंदराच्या विस्तारासाठी बांधकाम सुरू करणार असल्याचे रशियन लष्कराने सांगितले. याशिवाय विनाशिका आणि जहाजांच्या दुरूस्तीसाठी या बंदरावर तरंगती गोदी उभारण्याची योजना रशियाने आखली आहे. काही दिवसांपूर्वीच रशियाने येथील हेमिम हवाईतळावरील धावपट्टीच्या रुंदीकरणाचे काम केले होते. त्यामुळे रशिया सिरियातील आपल्या लष्करी तळाचा विस्तार करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.सिरियातील संघर्षात ३३८ दहशतवादी ठार - रशियन लष्कराची माहिती

सिरिया आणि रशियन लष्कराने दहशतवाद्यांच्या ठिकाणांवरील हल्ले वाढविले असताना, तुर्कीने देखील उत्तर सिरियाच्या अलेप्पो प्रांतावर हल्ले सुरू केले आहेत. येथील दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केले जात असल्याचे तुर्कीचे म्हणणे आहे. पण तुर्कीचे लष्कर आणि कंत्राटी जवान येथील नागरी वस्त्यांवर हल्ले चढवित असल्याचा आरोप सिरियन वृत्तवाहिनीने केला आहे.

leave a reply