युक्रेनने डोनेत्स्कमधील तुरुंगावर केलेल्या हल्ल्यात 53 जणांचा बळी

-रशियाचा दावा

Russia- Ukraine warमॉस्को/किव्ह – युक्रेनने डोनेत्स्क प्रांतातील तुरुंगावर चढविलेल्या हल्ल्यात 53 जणांचा बळी गेल्याचा दावा रशियाने केला. युक्रेनने आपल्यावरील आरोप फेटाळले असून सदर हल्ला रशियाच्या ‘वॉर क्राईम्स’चा भाग असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, रशियाने पूर्व तसेच उत्तर युक्रेनमध्ये चढविलेल्या हल्ल्यांमध्ये चांगले सामरिक यश मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

Su-35जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून युक्रेनने दक्षिण भागातील खेर्सन प्रांतांवर प्रतिहल्ल्यांची मोहीम सुरू केली होती. रशियाचे काही लष्करी तळ, कमांड पोस्टस्‌‍, इंधनाचे डेपो तसेच महत्त्वाचे ब्रिज लक्ष्य करण्यात युक्रेनला यश मिळाले होते. खेर्सनमधील काही गावे रशियाला गमवावी लागल्याचे दावेही युक्रेनने केले होते. याच यशाच्या बळावर पुढील दोन महिन्यात खेर्सन प्रांत रशियाच्या ताब्यातून मुक्त करु, असा इशारा युक्रेनी अधिकाऱ्यांनी दिला होता. मात्र युक्रेनचे हे इरादे उधळण्यासाठी रशिया अधिक आक्रमक झाला असून गेल्या काही दिवसात वाढलेली हल्ल्यांची तीव्रता त्याचाच भाग दिसत आहे.

Donetsk-Battle-Mapगेल्या 24 तासांमध्ये रशियाने पूर्व युक्रेनमधील विविध शहरांसह उत्तर युक्रेनमध्ये हवाई तसेच क्षेपणास्त्र हल्ले चढविले. या हल्ल्यांमध्ये रशियन फौजांना चांगले सामरिक यश मिळाल्याची माहिती समोर आली आहे. पूर्व युक्रेनमधील बाखमत भागा रशियाने आघाडी मिळविली आहे. तसेच उत्तर युक्रेनमधील खेर्सनमध्येही युक्रेनचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

रशियाचे हे हल्ले सुरू असतानाच गुरुवारी डोनेत्स्क प्रांतातील रशियन नियंत्रणाखाली असलेल्या येलेनोव्हका भागातील तुरुंगावर मोठा हल्ला झाला. हा हल्ला युक्रेनने केल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला आहे. या तुरुंगात रशियाने मारिपोलमधून ताब्यात घेतलेल्या युक्रेनच्या ‘अझोव्ह बटालियन’ मधील जवानांना कैद करून ठेवले आहे. युक्रेनने केलेल्या हल्ल्यात किमान 53 जणांचा बळी गेला असून 100हून अधिक जखमी असल्याचे सांगण्यात येेते. युक्रेनने आपल्याविरोधातील दावे फेटाळले असून सदर हल्ला रशियाच्या ‘वॉर क्राईम्स’चा भाग असल्याचा आरोप केला.

दरम्यान, युक्रेनने रशियन ताब्यातील दक्षिण युक्रेनच्या भागांवर पुन्हा हल्ले केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण विभागाने दिली.

leave a reply