बलोच बंडखोरांच्या हल्ल्यात पाकिस्तानचे सात जवान ठार

Baloch-Pakistanक्वेटा – बलोचिस्तानमध्ये ‘बलोच लिब्रेरशन फ्रंट’च्या (बीएलएफ) बंडखोरांनी पाकिस्तानी लष्करावर चढविलेल्या हल्ल्यात सात जवान ठार झाले. बलोचिस्तान स्वतंत्र होईपर्यंत पाकिस्तानी लष्करावरील हे हल्ले कायम राहतील, असा इशारा बलोच बंडखोरांनी दिला. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात बलोच बंडखोरांनी पाकिस्तानी लष्करावर ६७ वेळा हल्ले चढविले. यात पाकिस्तानी लष्कराचे १३१ जवान ठार झाले असून १००हून अधिक जखमी झाल्याचा दावा ‘बीएलएफ’ने केला.

गुरुवारी रात्री ‘बीएलएफ’ने बलोचिस्तानच्या मासकयमधील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवर हल्ला चढविला. हल्ल्यादरम्यान पाकिस्तानचे तीन जवान ठार झाले असून एकजण जखमी झाला. तर शुक्रवारच्या सकाळी ‘बीएलएफ’ने बलोचिस्तानच्या झाऊमधल्या पाकिस्तानी लष्कराच्या गस्ती पथकावर हल्ला चढविला. यात पाकिस्तानी लष्कराचे चार जवान ठार झाले असून दोन जण जखमी झाले.

Baloch-Pakistanबलोचिस्तान स्वतंत्र होईपर्यंत पाकिस्तानी लष्करावरील हे हल्ले कायम राहतील, असा इशारा ‘बीएलएफ’चे प्रवक्ते ग्वाहराम बलोच यांनी दिला. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी जर्मनीमध्ये बलोचिस्तानच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचाराविरोधात निदर्शने केली होती. पाकिस्तानी लष्कराने बलोचिस्तानमध्ये एका नऊ वर्षाच्या मुलीची हत्या घडवून आणली होती. याविरोधात बलोचिस्तानची जनता संतापली आहे.

leave a reply