केरळनंतर बंगळुरूमध्ये ‘आयएस’चे सर्वात मोठे मॉड्युल उद्ध्वस्त

बंगळुरू – राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ‘आयएस’चे मॉड्युल’ उद्धवस्त करत बंगळूरूमधून दोन जणांना अटक केली आहे. २०१३-१४ साली काही जण बंगळुरूमधून इराक आणि सीरियाला गेले होते. केरळनंतर बंगळुरूमधून सर्वाधिक संख्येने तरुण ‘आयएस’मध्ये सामील होण्यासाठी इराक व सीरियाला नागरिक गेले होते. यातील दोन जण “आयएस’साठी सिरियामध्ये लढताना मारले गेले होते. तर अन्य २०१४ मध्ये भारतात परतले असून ते अद्याप ते फरार आहेत. याच मॉड्युलमधील दोघांना अटक झाली आहे.

मॉड्युल उद्ध्वस्त

मॉड्युल उद्ध्वस्त

एनआयए‘ने अहमद अब्दुल कादर आणि इरफान नासिर‘ या आयएस’ दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेला अब्दुल हा एका बँकेत काम करतो, तर नासिर त्याचा कौटुंबिक व्यवसाय चालवितो. या दोघांनी या मॉड्यूलमधील बहुतेक सदस्यांचा खर्चाची व्यवस्था केली होती. केरळच्या कसारागोड आणि पलक्कड जिल्ह्यातून २२ जण इराक आणि सिरियाला गेले. भारतातून इराक आणि सिरीयाला जाणारा हा सर्वात मोठा गट होता असे मानले जाते. त्यानंतर बंगळुरुमधील ‘आयएस’ मॉड्यूल सर्वात मोठे असल्याचे समोर येत आहे, असे अधिकाऱ्यांने म्हटले आहे.

ऑगस्ट महिन्यात बंगळुरूमध्ये अब्दूर रहमान या नेत्ररोगतज्ज्ञाला अटक करण्यात आली होती. तो बंगळूरूच्या रमैया हॉस्पिटलमध्ये कार्यरत होता. ‘एनआयए’ने ‘इस्लामिक स्टेट खोरासन प्रोविन्स’चा (आयएसकेपी) सदस्य असल्याच्या संशयावरून रहमानला अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘आयएस’चे हे मॉड्युल’ समोर आले.

leave a reply