‘ओमिक्रॉन व्हेरिअंट’च्या फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर युरोपात ‘अँटी लॉकडाऊन’ निदर्शने

व्हिएन्ना/ऍमस्टरडॅम – कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या वाढत्या फैलावामुळे युरोपिय देशांमध्ये लादण्यात आलेल्या निर्बंधांविरोधात तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. शनिवारी युरोपातील सहा प्रमुख देशांमध्ये लॉकडाऊन व इतर निर्बंधांना विरोध दर्शविणारी व्यापक निदर्शने झाली. यात जर्मनी, ब्रिटन, स्पेन, इटली, ऑस्ट्रिया, नेदरलॅण्डस् या देशांचा समावेश आहे. आोमिक्रॉनचा फैलाव झालेल्या ३८ देशांपैकी १३ देश युरोपातील आहेत.

‘ओमिक्रॉन व्हेरिअंट’च्या फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर युरोपात ‘अँटी लॉकडाऊन’ निदर्शने ‘ओमिक्रॉन व्हेरिअंट’च्या फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर युरोपात ‘अँटी लॉकडाऊन’ निदर्शने

युरोपात सप्टेंबर महिन्याच्या अखेरपासून कोरोनाचे रुग्ण तसेच बळींची संख्या वाढण्यास सुरुवात झाली होती. हा वाढता संसर्ग नियंत्रणात आणण्यात अपयश आल्याने युरोपिय देशांनी हळुहळू नियम कठोर करण्यास सुरुवात केली होती. यात लस न घेतलेल्यांसाठी ‘लॉकडाऊन’, ‘हेल्थ पास’, सार्वजनिक जागांवर गर्दी करण्यास बंदी, सोशल डिस्टंसिंगची कडक अंमलबजावणी, लसीकरणासाठी नवे नियम, लष्करी तैनाती यासारख्यांचा समावेश आहे. मात्र युरोपिय जनतेत या नियमांविरोधात नाराजीची भावना असून नागरिकांनी रस्त्यावर उतरून उघडपणे निषेध नोंदविण्यास सुरुवात केली आहे.

‘ओमिक्रॉन व्हेरिअंट’च्या फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर युरोपात ‘अँटी लॉकडाऊन’ निदर्शनेशनिवारी ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये तब्बल ४० हजारांहून अधिक नागरिक निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. आॉस्ट्रियाने गेल्याच महिन्यात लॉकडाऊनची घोषणा केली असून फेब्रुवारी महिन्यापासून लसीकरण अनिवार्य करण्याचे संकेत दिले आहेत. याविरोधात रस्त्यावर उतलेल्या ऑस्ट्रियन नागरिकांनी ‘आय विल डिसाईड मायसेल्फ’, ‘मेक ऑस्ट्रिया ग्रेट अगेन’, ‘न्यू इलेक्शन्स’ यासारखे फलक झळकावून सरकारी निर्बंधांविरोधात घोषणा दिल्या. सुमारे ९० लाख लोकसंख्या असलेल्या ऑस्ट्रियात कोरोनामुळे १२ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे.

‘ओमिक्रॉन व्हेरिअंट’च्या फैलावाच्या पार्श्‍वभूमीवर युरोपात ‘अँटी लॉकडाऊन’ निदर्शनेऑस्ट्रियापाठोपाठ नेदरलॅण्ड्स, स्पेन, इटली, ब्रिटन व जर्मनीतही निदर्शने झाल्याचे समोर आले. नेदरलॅण्ड्सच्या उटरेक्ट शहरात निदर्शने झाली असून नागरिकांनी ‘मेडिकल फ्रीडम नाऊ’ तसेच ‘अनव्हॅक्सिनेटेड लाईव्हज् मॅटर’चे फलक झळकावले. जर्मनीत राजधानी बर्लिन तसेच फ्रँकफर्टमध्ये निदर्शने करण्यात आली. जर्मनीतील कोरोना बळींची संख्या एक लाखांवर गेली असून पुन्हा ‘लॉकडाऊन’चे संकेत देण्यात आले आहेत. स्पेनच्या बार्सिलोना, इटलीच्या ट्युरिन तसेच ब्रिटनच्या यॉर्कमध्ये कोरोनाच्या निर्बंधांविरोधात मोर्चे काढण्यात आले. कोरोनाच्या लाटांचा फटका बसत असतानाही युरोपिय महासंघ व प्रमुख देशांनी लसीकरणाची मोहीम योग्यरित्या राबविलेली नाही. त्यामुळे युरोपिय जनतेत मोठी नाराजी असल्याचे यापूर्वीही समोर आले होते.

leave a reply