लष्करप्रमुखांकडून अरुणाचल, सिक्कीममधील चीन सीमेवरील सज्जतेचा आढावा

नवी दिल्ली – लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी गुरुवारी आसामच्या तेजपूर येथील लष्कराच्या तळाला भेट दिली. लडाखमधील सीमेवर वाढलेल्या तणावानंतर चीनने तिबेट आणि ‘अक्साई चीन’मध्ये तैनाती वाढविली आहे. चीनच्या या तैनातीच्या पार्श्वभूमीवर भारताने लडाखबरोबर अरुणाचल प्रदेश, सिक्कीममधील सीमेवर सज्जता वाढविली असून या सीमांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या लष्करच्या ४ कॉर्प्सचे मुख्यालय असलेल्या तेजपूर तळाचा लष्कर प्रमुखांनी केलेला दौरा महत्वाचा ठरतो.

अरुणाचल

भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी ५ व्या टप्प्यातील बैठक नुकतीच पार पडली. मात्र या बैठकही पूर्णपणे निष्फळ ठरली असून चीन ‘पॅंगोन्ग त्सो’च्या भागातून मागे हटण्यास तयार नाही. भारताने प्रथम येथून आपल्या सौनिकांना मागे घ्यावे, त्यानंतर आपण आपले जवान मागे घेऊ, असा नवा बहाणा चीनने शोधला आहे. त्यामुळे भारत आणि चीनमधील सीमेवरील हा तणाव इतक्यात कमी होणार नाही हे स्पष्ट होऊ लागले आहे. सामरिक विश्लेषकही तणाव इतक्यात कमी होण्याची शक्यता दिसून येत नसल्याचा दावा करीत आहे.

त्यामुळे भारतीय लष्करानेही आपली वाढविलेली तैनाती अशीच कायम ठेवण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. हिवाळ्यातील प्रतिकूल स्थितीतही अतिरिक्त तैनाती आणि शश्त्रास्र सज्जात कायम ठेवण्याच्या हालचाली लष्कराने सुरु केल्याच्या बातम्या आल्या होत्या. चीनच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी लष्कराला चार ते सहा विशेष टेहळणी उपग्रहांची आवश्यकता असून याच कामासाठी हे उपग्रह तैनात करावेत अशी आग्रही मागणी लष्कराने सरकारकडे केल्याच्या बातम्याही येत आहे. या दृष्टीने योजनाही आखली जात आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख आसाम दौऱ्यावर गेले आहेत. तेजपूर येथील लष्कराचा तळाला चीन सीमेवरील तैनातीच्या दृष्टीने विशेष महत्व आहे. ४ कॉर्प्सचे मुख्यलाय येथे असून ईशान्य भारताला जोडणार सिलिगुडी हायवेचे संरक्षण, तसेच अरुणाचल प्रदेशमध्ये जलदगतीने तैनतीसाठी आसाममधील हा तळ महत्वाचा मनाला जातो. सीमेवर जलदगतीने सज्जता करता यावी यासाठी गेल्या काही वर्षात आसाम आणि तेथून अरुणाचल प्रदेश पर्यंत पायभूत सुविधानाचा विकास करण्यात आला आहे. लडाखमधील तणावानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये अतिरिक्त तैनाती वाढविण्यात आली असताना लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी तेजपूरला गेले आहेत. भारत सर्वच चीन सीमेवर सज्ज असल्याचा संदेशही यातून देण्यात आला आहे.

दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने चीनने आपल्या दिलेल्या आश्वासनांचे पालन करावे, असे पुन्हा एकदा निक्षुन सांगितले आहे. चीन सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दिलेले आश्वासन पाळण्याचे गांभीर्याने घेईल, अशी अपेक्षा आहे, असा टोला भारताने लगावला आहे. नुकतेच चीनकडून भारताने सीमेवरील तणाव आणि द्विपक्षीय संबंध एकत्र करू नयेत. मतभेदाचे रूपांतर वादात होणार नाही याची दक्षता भारत घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. यापार्श्वभूमीवर भारताने चीनला त्याच्या विश्वासघाताची आठवण पुन्हा करून दिली आहे.

leave a reply