मित्रदेश गमावण्यात, सहकारी देशांना दूर करण्यात बायडेन तरबेज आहेत

- अरब दैनिकांची जोरदार टीका

रियाध/कैरो – बायडेन यांची अविचारी व चुकीच्या धोरणांमुळे टोरंटोपासून ते टोकिओपर्यंत सर्वचजण बाधित झाले आहेत. अमेरिकेचे मित्रदेश गमावण्यात आणि त्यांना दूर सारण्यात राष्ट्राध्यक्ष बायडेन तरबेज बनले आहेत, अशी जळजळीत टीका आखातातील विश्‍लेषक करीत आहेत. येत्या काही तासात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन युरोपचा दौरा करतील. अमेरिकेच्या मित्र व सहकारी देशांना बायडेन या दौर्‍यात आश्‍वस्त करणार असल्याचा दावा केला जातो. या पार्श्‍वभूमीवर, अरब देशांच्या माध्यमांमधून झालेली ही टीका लक्षवेधी ठरते.

मित्रदेश गमावण्यात, सहकारी देशांना दूर करण्यात बायडेन तरबेज आहेत - अरब दैनिकांची जोरदार टीकाबायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हातात घेऊन एक वर्ष उलटले आहे. पण या वर्षभरात बायडेन यांची धोरणे अमेरिकेचाच घात करणारी ठरल्याची टीका सर्वच स्तरातून होत आहे. बायडेन यांच्या परराष्ट्र धोरणांमुळे अमेरिकेच्या मित्र आणि सहकारी देशांची सुरक्षा धोक्यात आल्याचा आरोप तीव्र झाला आहे. आखातातील आघाडीची वर्तमानपत्रे आणि विश्‍लेषक यांनी गेल्या काही दिवसांपासून बायडेन प्रशासनाच्या या धोरणांवर जोरदार हल्ले चढवित आहेत.

‘रशियाकडून येणार्‍या धमक्या आणि त्यावर अमेरिकेकडून मिळणारे सुरक्षेचे आश्‍वासन, ही सध्याच्या काळातील सर्वात वाईट राजकीय-लष्करी परिस्थिती ठरते’, असा टोला ‘अशराक अल अवसात’ या लंडनस्थित अरबी दैनिकाचे स्तंभलेखक इयाद अबू छाक्रा यांनी लगावला. रशिया-युक्रेन संघर्षावर भाष्य करताना छाक्रा यांनी मोजक्या शब्दात बायडेन प्रशासनाच्या बेताल धोरणांवर बोट ठेवले.

मित्रदेश गमावण्यात, सहकारी देशांना दूर करण्यात बायडेन तरबेज आहेत - अरब दैनिकांची जोरदार टीकातर ‘अरब न्यूज’चे संपादक फैझल अब्बास यांनी आपल्या लेखात इस्रायल, सौदी अरेबिया, युएई, अफगाणिस्तानबाबतच्या बायडेन प्रशासनाच्या धोरणांवर प्रहार केले. व्हिएन्ना येथील वाटाघाटींमध्ये बायडेन प्रशासन इराणच्या मागण्यांसमोर झुकले. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सना दहशतवादी संघटनांच्या यादीतून वगळण्याचा निर्णय इस्रायलला रुचलेला नाही. रिव्होल्युशनरी गार्ड्सना टेरर लिस्टमधून वगळून इराणबरोबर अणुकरार करणे म्हणजे, तेलाने आग विझविण्याच्या मुर्खपणासारखे असल्याची जाणीव अब्बास यांनी करुन दिली.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर वैयक्तिक सूड उगविण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन हे ट्रम्प प्रशासनाच्या काळातील सर्व निर्णय मागे घेत आहेत. यातूनच बायडेन प्रशासनाने येमेनमधील हौथी बंडखोरांना दहशतवादी संघटनांच्या यादीतून वगळले. मित्रदेश गमावण्यात, सहकारी देशांना दूर करण्यात बायडेन तरबेज आहेत - अरब दैनिकांची जोरदार टीकापण यामुळे आत्मविश्‍वास वाढलेल्या हौथींनी थेट सौदी व युएईच्या राजधानींवर हल्ले सुरू केले, इंधन प्रकल्पांना लक्ष्य केले. यामुळे सौदी नाराज झाला असून या देशाने इंधनाचे उत्पादन वाढविण्याचे नाकारले, याकडे अब्बास यांनी लक्ष वेधले आहे.

बायडेन यांच्या धोरणांमुळे अमेरिकेने सौदी अरेबियासारखा धोरणात्मक सहकारी देश गमावल्याचा आरोप इजिप्तच्या दैनिकाने केला. युक्रेनबाबतही बायडेन प्रशासनाचे निर्णय चुकल्याचा ठपका अरब दैनिकाने ठेवला. इतकेच नाही तर गेल्या वर्षभरात कॅनडाची राजधानी टोरंटोपासून ते जपानची राजधानी टोकिओपर्यंत बायडेन यांच्या चुकीच्या धोरणांची किंमत प्रत्येकाला चुकवावी लागत असल्याची परखड जाणीव अब्बास यांनी करून दिली आहे.

leave a reply