बायडेन यांनी तैवानबाबतचे अमेरिकेचे धोरण कायम ठेवावे

- जपानच्या उपसंरक्षणमंत्र्यांचे आवाहन

अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी तैवानबाबत चीनविरोधातील भूमिका यापुढेही कायम ठेवावी, असे आवाहन जपानचे उपसंरक्षणमंत्री यासूहिदे नाकायामा यांनी केले. यासाठी चीनने हाँगकाँगसह इतर भागात आक्रमक भूमिका घेऊन आपला विस्तार केल्याची आठवण नाकायामा यांनी करून दिली.

हाँगकाँगसारखा प्रकार चीन तैवानच्या बाबतही करू शकतो. तैवानची सुरक्षा ही अमेरिका व जपानसाठी ‘रेड लाईन’ अर्थात मर्यादा रेषा आहे. ट्रम्प प्रशासनाने चीनच्या विरोधात तैवानला लष्करी सहाय्य पुरवून चीनवर कायम दबाव ठेवला होता. अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी देखील चीन तैवानची रेड लाईन ओलांडणार नाही, यासाठी चीनवर दबाव कायम ठेवावा, असे उपसंरक्षणमंत्री नाकायामा यांनी सुचविले आहे.

leave a reply