बायडेन यांचा कमकुवतपणाच इस्रायलवरील हल्ल्याला जबाबदार

- माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टीका

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेल्या ज्यो बायडेन यांचा कमकुवतपणा व इस्रायलला पाठिंबा न देण्याचे धोरण यामुळे जग अधिकाधिक हिंसक व अस्थीर बनले आहे, अशी घणाघाती टीका माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. काही विश्‍लेषकांनी देखील बायडेन सत्तेवर आल्यानंतर पॅलिस्टिनींच्या हिंसेत वाढ झाल्याची नोंद केली आहे. दरम्यान, इस्रायल व गाझामधील या संघर्षावर चिंता व्यक्त करून बायडेन प्रशासनाने यावर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक आयोजित केली आहे.

बायडेन यांचा कमकुवतपणाच इस्रायलवरील हल्ल्याला जबाबदार - माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टीकाअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी बायडेन प्रशासनावर हल्ला चढविताना, आपल्या कार्यकाळातील परिस्थितीची आठवण करून दिली. ‘आपण प्रशासनात असताना, इस्रायलवर असे हल्ले झाले नाहीत. कारण इस्रायलवर हल्ला झालाच तर अमेरिका ठामपणे इस्रायलच्या पाठिशी उभी राहिल आणि त्वरित प्रतिकार करील, याची इस्रायलच्या शत्रूंना जाणीव होती. म्हणूनच आपल्या प्रशासनात जगभरात शांतता होती’, असे ट्रम्प यांनी फटकारले. त्याचबरोबर इस्रायलविरोधात जहाल भूमिका घेणार्‍या डेमोक्रॅट पक्षाच्या सिनेटर इलहान ओमर यांचा ट्रम्प यांनी समाचार घेतला.बायडेन यांचा कमकुवतपणाच इस्रायलवरील हल्ल्याला जबाबदार - माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टीका

दरम्यान, या प्रश्‍नावर सुरक्षा परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली आहे. इस्रायल आणि गाझात सुरू असलेला संघर्ष आता संपूर्ण युद्धाच्या दिशेने प्रवास करीत असल्याची चिंता संयुक्त राष्ट्रसंघाने आखातासाठी नियुक्त केलेले विशेषदूत टोर वेनेस्लँड यांनी व्यक्त केली आहे.

leave a reply