ब्रिटनच्या भावी पिढ्यांना चीनपासून सर्वाधिक धोका

- ‘एमआय६’च्या माजी प्रमुखांचा इशारा

भावी पिढ्यांनालंडन – ‘येत्या काळात ब्रिटन आणि चीनमधील वैचारिक पातळीवरील मतभेद विकोपाला जातील. तसे झाल्यास ब्रिटनच्या भावी पिढ्यांना चीनच्या कम्युनिस्ट विचारांपासून सर्वात मोठा धोका संभवतो’, असा इशारा ब्रिटिश गुप्तचर यंत्रणा ‘एमआय६’चे माजी प्रमुख सर ऍलेक्स यंगर यांनी दिला. हा धोका टाळायचा असेल तर ब्रिटनला तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक क्षेत्रात आघाडी घ्यावीच लागेल, असे सर यंगर यांनी सुचविले आहे.

येत्या काही तासात पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे सरकार ब्रिटनच्या संसदेत सुरक्षाविषयक अहवाल सादर करणार आहेत. राजकीय, आर्थिक तसेच सुरक्षाविषयक आघाडीवर ब्रिटनसमोर असलेल्या आव्हानांबाबत या अहवालात महत्त्वाचे मुद्दे मांडले जाणार आहेत. सदर अहवालासंबंधीचे काही तपशील ब्रिटनच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहेत. चीन आणि रशियापासून ब्रिटनला असलेल्या धोक्याचा मुद्दा यामध्ये मांडण्यात आल्याचा दावा ब्रिटनच्या वर्तमानपत्राने केला.

भावी पिढ्यांनाया पार्श्‍वभूमीवर, गेल्या वर्षीच ‘एमआय६’च्या सेवेतून निवृत्त झालेल्या सर ऍलेक्स यंगर यांनी ब्रिटिश रेडिओवाहिनीशी बोलताना चीनपासून आपल्या देशाच्या सुरक्षेला सर्वाधिक धोका असल्याचे म्हटले आहे. ‘येत्या काळात महासत्ता म्हणून उदयाला येणार्‍या चीनचे वर्तन सुसभ्य असेल, अशी अपेक्षा ठेवता येणार नाही. कारण जागतिक महासत्ता बनलेल्या चीनची कम्युनिस्ट राजवट आपल्या विचारधारेचा प्रचार अधिकच तीव्र करील. असे झाले तर येत्या काळात ब्रिटन व चीनमधील वैचारिक मतभेद विकोपाला जातील. यामुळे उभय देशांमध्ये स्पर्धा पेटून परस्परांवरील विश्‍वास कमी होईल’, असा इशारा यंगर यांनी दिला.

चीनच्या या धोक्याचा सामना करायचा असेल तर ब्रिटनला देखील चीनला कळते त्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल. यासाठी ब्रिटनने तंत्रज्ञानविषयक नव्या संकल्पनांवर काम करून आपले सामर्थ्य वाढवावे आणि मित्रदेशांची आघाडी अधिकाधिक भक्कम करीत रहावी’, असे एमआय६च्या माजी प्रमुखांनी सुचविले. मंगळवारी ब्रिटनच्या संसदेत सादर केल्या जाणार्‍या अहवालात देखील असाच चीनविरोधी सूर लागण्याची शक्यता वर्तविण्यात येते.भावी पिढ्यांना

गेल्या काही आठवड्यांपासून ब्रिटनमधील लष्करी विश्‍लेषक व अभ्यासगट ब्रिटनच्या राजकारणात आणि शैक्षणिक संस्थांमध्ये चीनच्या वाढत असलेल्या प्रभावाकडे सरकारचे लक्ष वेधत आहेत. त्याचबरोबर चीनच्या प्रभावाला आव्हान देण्यासाठी ब्रिटनने भारताकडे अधिक लक्ष केंद्रीत करावे व इंडो-पॅसिफिक क्षेत्रात अधिक गुंतवणूक करावी, असे लष्करी विश्‍लेषक सुचवित आहेत.

दरम्यान, ब्रिटनने देखील ‘साऊथ चायना सी’च्या क्षेत्रातील गस्तीसाठी आपली विमानवाहू युद्धनौका रवाना करण्याची घोषणा केली आहे. येत्या वर्षअखेरीस ‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’ या सागरी क्षेत्रात दाखल होणार असून यामुळे चीन कमालीचा अस्वस्थ झाला आहे.

leave a reply