तालिबानचे क्रौर्य नव्याने जगासमोर आले

- तालिबानने हेरात प्रांतात चार मृतदेह क्रेनवर लटकविले

काबुल – डोक्यात गोळ्या घालून ठार करण्यापासून ते हातपाय छाटण्यापर्यंतच्या क्रूर शिक्षा अफगाणिस्तानात पुन्हा लागू करणार असल्याचे नुरुद्दीन तुराबी या तालिबानच्या नेत्याने केली होती. त्याला एक दिवस उलटत नाही तोच तालिबानने आपल्या क्रौर्याचे आणखी एकवार भयंकर प्रदर्शन घडविले. हेरात प्रांतात तालिबानने चार अफगाणींचे मृतदेह क्रेनवर लटकवून ठेवले. आपल्या विरोधात जाणार्‍यांना थरकाप उडावा, यासाठी तालिबान या मृतदेहांचे अशारितीने प्रदर्शन करीत आहे. ठार झालेल्या या चौघांवर अपहरणाचे आरोप होते. पण त्याची शाहनिशा व निवाडा कुणी केला, याची माहिती देण्याची तसदी तालिबानने घेतलेली नाही.

तालिबानचे क्रौर्य नव्याने जगासमोर आले - तालिबानने हेरात प्रांतात चार मृतदेह क्रेनवर लटकविलेतालिबानचे दहशतवादी आपल्या विरोधकांची धरपकड करीत असल्याच्या बातम्या याआधी प्रसिद्ध झाल्या होत्या. तालिबान विरोधकांना अटक करून त्यांना मोटारीच्या डिकीमध्ये कोंडत असल्याचे व्हिडिओ समोर आले होते. पण या विरोधकांचे काय झाले, याची माहिती उघड झाली नव्हती. त्याचबरोबर छोट्यामोठ्या गुन्ह्यांखाली अटक केलेल्या आरोपींचे भविष्य देखील तालिबानच्या राजवटीत टांगणीला लागले होते. तालिबानच्या नव्या राजवटीत न्यायपद्धती कशी असेल, याकडे जगाचे लक्ष लागले होते.

मुल्ला तुराबी याने आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेशी बोलताना, तालिबानच्या शिक्षेत फरक करणार नसल्याचे जाहीर केले. डोक्यात गोळी घालून ठार करणे, हातपाय छाटणे या शिक्षा नव्याने लागू करून त्याचे व्हिडिओ जगासमोर प्रसिद्ध केले जातील. यामुळे तालिबानचे नियम मोडणार्‍यांसाठी योग्य तो संदेश जाईल, असे तुराबीने म्हटले होते. तालिबानचे क्रौर्य नव्याने जगासमोर आले - तालिबानने हेरात प्रांतात चार मृतदेह क्रेनवर लटकविलेयामुळे या दहशतवादी संघटनेच्या पाठिशी उभ्या राहणार्‍यांच्या अडचणी वाढल्या होत्या. अशा परिस्थितीत, तालिबानने हेरातमधील चार आरोपींना गोळ्या घालून ठार केले व त्यांचे मृतदेह क्रेनशी टांगून वीस वर्षांपूर्वीची आपली मानसिकता आजही कायम असल्याचे तालिबानने दाखवून दिले.

या महिन्याच्या सुरुवातीला मझार-ए-शरीफच्या चौकात तालिबानने चार जणांना गोळ्या घालून त्यांचे मृतदेह रस्त्यात सोडून दिले होते. तर राजधानी काबुल व हेरातमध्ये महिलांना चाबकाचे फटके दिल्याचे व्हिडिओ समोर आले होते. यामध्ये तालिबानविरोधात निदर्शने करणार्‍या महिलांचा समावेश होता. यानंतर तालिबानवर जोरदार टीका झाली होती. शनिवारच्या घटनेनंतर जगभरातून तालिबानचा निषेध होत आहे. दरम्यान, तालिबानच्या नव्या न्यायविभागात महिला न्यायाधीशांनाही स्थान असेल, असे तालिबानचा सहसंस्थापक तुराबी याने म्हटले होते. पण याआधी अफगाणिस्तानच्या न्यायव्यवस्थेत न्यायाधीश पदावर असलेल्या सुमारे २०० महिला न्यायाधीशांचा शोध घेत असल्याचा दावा अमेरिकी वर्तमानपत्राने केला आहे. या महिला न्यायाधीशांनी गेल्या वीस वर्षांमध्ये तालिबानच्या विरोधात निकाल दिले होते. त्यामुळे या महिला न्यायाधीशांचा शोध घेऊन तालिबान त्यांना शिक्षा करण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला जातो.

leave a reply