‘चिल्ड्रन मास ग्रेव्ह’ हे कॅनडाच्या अपयशाचे प्रतीक

- पंतप्रधान जस्टिन ट्य्रुड्यू यांची कबुली

ओटावा – ‘कॅमलूप्समध्ये सापडलेल्या मुलांच्या सामूहिक थडग्यांच्या घटनेकडे कॅनडाची जनता डोळेझाक करु शकत नाही. कॅनडाला हे सत्य स्वीकारावेच लागेल. देश म्हणून कॅनडा या मुलांप्रती, त्यांच्या कुटुंबियाप्रती व त्यांच्या समाजासाठी असलेले कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरला आहे’, या शब्दात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्य्रुड्यू यांनी ‘मास ग्रेव्ह’ची घटना हे कॅनडाचे अपयश असल्याची कबुली दिली. कॅनडातील विरोधी पक्षनेत्यांनी सदर घटना म्हणजे वंशसंहाराचाच प्रयत्न होता, अशी जळजळीत टीका केली आहे.

‘चिल्ड्रन मास ग्रेव्ह’ हे कॅनडाच्या अपयशाचे प्रतीक - पंतप्रधान जस्टिन ट्य्रुड्यू यांची कबुलीगेल्या आठवड्यात कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील कॅमलूप्स शहरातील एका ‘रेसिडेन्शिअल स्कूल’जवळ मुलांचे सामूहिक थडगे असल्याचे उघड झाले होते. ‘ग्राऊंड पेनिट्रेटिंग रडार’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेल्या तपासातून ही बाब समोर आली. शाळेजवळच्या भागात सापडलेल्या ‘मास ग्रेव्ह’मध्ये तीन वर्षाच्या मुलापासून मोठ्या मुलांपर्यंतच्या 215 शवांचा समावेश आहे. ही सर्व मुले कॅनडातील मूलनिवासी अथवा आदिवासी म्हणून ओळखण्यात येणार्‍या जमातींमधील आहेत.

‘चिल्ड्रन मास ग्रेव्ह’ हे कॅनडाच्या अपयशाचे प्रतीक - पंतप्रधान जस्टिन ट्य्रुड्यू यांची कबुली19व्या व 20व्या शतकात कॅनडातील ख्रिस्तधर्मियांच्या गटाकडून मोठ्या प्रमाणात ‘रेसिडेन्शिअल स्कूल्स’ची उभारणी करण्यात आली होती. कॅनडाचे मूळ रहिवासी असणार्‍या व ‘फर्स्ट नेशन्स’ म्हणून ओळख असणार्‍या जमातींमधील हजारो मुलांना जबरदस्तीने या शाळेत भरती करण्यात आले होते. या शाळांमध्ये पाठविण्यात आलेली हजारो मुले बेपत्ता झाल्याचे चौकशीतून समोर आले होते. आतापर्यंतच्या माहितीनुसार ही संख्या चार हजारांहून अधिक आहे.

शाळांमध्ये घडलेल्या घटनांचा तपास करण्यासाठी ‘ट्रुथ अ‍ॅण्ड रिकौन्सिलेशन कमिशन’ची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाने, शाळांमध्ये घडलेले प्रकार हा सांस्कृतिक वंशसंहाराचा (कल्चरल जिनोसाईड) भाग असल्याचा ठपका ठेवला होता. 2008 साली तत्कालिन कॅनडा सरकारने ‘फर्स्ट नेशन्स’ जमातींविरोधात राबविण्यात आलेल्या धोरणांबद्दल जाहीर माफी मागितली होती. त्यानंतर कॅनडा सरकारने बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी तसेच सदर जमातींना सामावून घेण्यासाठी विशेष मोहिमही हाती घेतली होती.‘चिल्ड्रन मास ग्रेव्ह’ हे कॅनडाच्या अपयशाचे प्रतीक - पंतप्रधान जस्टिन ट्य्रुड्यू यांची कबुली

या पार्श्‍वभूमीवर, ‘चिल्ड्रन मास ग्रेव्ह’च्या घटनेने कॅनडातील राजकीय व सामजिक वर्तुळ पूर्णपणे ढवळून निघाले आहे. पंतप्रधान ट्य्रुड्यू यांनी, सदर घटना हा कॅनडाच्या इतिहासातील अत्यंत लाजिरवाणा प्रकार असल्याचे मान्य केले. त्याचवेळी कॅमलूप्समध्ये सापडलेली ‘मास ग्रेव्ह’ एकमेव घटना नसून मोठ्या शोकांतिकेचा भाग असल्याचे संकेतही दिले. गेल्या दोन शतकात ‘फर्स्ट नेशन्स’ जमातीतील मुलांसाठी उभारलेल्या सर्व ‘रेसिडेन्शिअल स्कूल्स’ची तपासणी करण्यात येईल, असेही कॅनडाच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

leave a reply