ब्रिटीश नौदलाने ‘एआय’द्वारे सुपरसोनिक क्षेपणास्त्र भेदले

लंडन – ब्रिटनच्या नौदलाने ध्वनीच्या दुप्पट वेगाने प्रवास करणारे सुपरसोनिक क्षेपणास्त्र आर्टिफिशल इंटेलिजन्स-एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने भेदले. नाटो देशांच्या सुरू असलेल्या युद्धसरावात ही चाचणी घेतल्याची माहिती ब्रिटनच्या नौदलाने जाहीर केली. भविष्यात सुपरसोनिक क्षेपणास्त्रांचे हल्ले थोपविण्यासाठी एआयचा वापर होऊ शकतो व आपण यासाठी सज्ज असल्याचे ब्रिटनच्या नौदलाने या चाचणीद्वारे दाखवून दिले.

ब्रिटीश नौदलाने ‘एआय’द्वारे सुपरसोनिक क्षेपणास्त्र भेदलेस्कॉटलंड आणि नॉर्वेच्या सागरी क्षेत्रात नाटोचा ‘फॉर्मिडेबल शिल्ड 2021’ युद्धसराव सुरू आहे. दोन आठवड्यांच्या या सरावात नाटो सदस्य देशांच्या युद्धनौका, विनाशिका सहभागी झाल्या असून यात लाईव्ह फायरिंगचा वापर केला जात आहे. यामध्ये ब्रिटनच्या ‘एचएमएस ड्रॅगन’, ‘एचएमएस लँकेस्टर’ आणि एचएमएस अरगिल’ या विनाशिका सहभागी झाल्या आहेत. यापैकी ड्रॅगन अणि लँकेस्टर या विनाशिकांवरून एआयची चाचणी घेतली.

ब्रिटीश नौदलाने ‘एआय’द्वारे सुपरसोनिक क्षेपणास्त्र भेदलेयासाठी ब्रिटनचे संरक्षण मंत्रालय आणि संलग्न कंपन्यांनी तयार केलेल्या ‘स्टार्टल’ आणि ‘सायकोया’ यंत्रणेचा वापर केला. स्टार्टलमुळे हवाई सुरक्षेसंबंधीची रिअल-टाईम अर्थात प्रत्यक्ष वेळेची माहिती व?अलर्ट युद्धनौकेवरील ऑपरेशन्स कमांडला दिली जाते. तर सायकोयामुळे धोकादायक ठरणार्‍या क्षेपणास्त्राला भेदण्यासाठी कुठल्या क्षेपणास्त्राचा वापर होऊ शकतो याची माहिती पुरविली जाते. विनाशिकेवरील अनुभवी ऑपरेटरपेक्षाही सदर यंत्रणा वेगाने काम करते, अशी माहिती ब्रिटनच्या नौदलाने दिली.

विनाशिकांवरील अधिकारी या दोन्ही यंत्रणांमुळे प्रभावित झाले. एआयचा वापर असलेल्या या यंत्रणांमुळे शत्रूच्या सुपरसोनिक क्षेपणास्त्रांचा कमी वेळेत माग काढणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे अधिक सोपे झाल्याचे ब्रिटीश नौदल अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. याआधी ब्रिटनच्या नौदलाने एआयची चाचणी घेतली होती. पण युद्धसरावातील लाईव्ह फायरिंगमध्ये सुपरसोनिक क्षेपणास्त्र नष्ट करण्यासाठी ब्रिटनच्या नौदलाने या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ ठरते.ब्रिटीश नौदलाने ‘एआय’द्वारे सुपरसोनिक क्षेपणास्त्र भेदले

त्यातच नाटोचा फॉर्मिडेबल शिल्ड युद्धसराव हा आपल्या सुरक्षेला आव्हान देणारा असल्याची टीका रशियाची सरकारी माध्यमे करीत आहेत. या युद्धसरावाद्वारे नाटो सदस्य देश लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करीत असल्याचा आरोप रशियन माध्यमे करीत आहेत. तर काही दिवसांपूर्वी रशियाने एआय निर्मित सागरी ड्रोन्स, रणगाडे, लष्करी वाहन्यांच्या निर्मितीची घोषणा केली होती. हे रणगाडे, लष्करी वाहने सीमेवर तैनात करण्याचे संकेत रशियाने दिले होते. अशा परिस्थितीत, या युद्धसरावात ब्रिटनने एआयच्या सहाय्याने सुरपसोनिक क्षेपणास्त्र भेदून, आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात आपणही तयार असल्याचे दाखवून दिले आहे.

leave a reply