लष्करी क्षमतेच्या बळावर चीन पाश्‍चात्य देशांच्या आघाडीवर भारी पडेल

- कॅनडाच्या लष्करप्रमुखांचा इशारा

ओटावा/बीजिंग – ‘चीनने हायपरसोनिक तंत्रज्ञान, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व क्वांटम कॉम्प्युटिंगच्या आधारे प्रचंड लष्करी क्षमता विकसित केली आहे. १९४०च्या दशकानंतर प्रथमच एखाद्या देशाने इतक्या मोठ्या प्रमाणात लष्करी सामर्थ्य मिळविले असून, त्या जोरावर चीन पाश्‍चात्य देशांच्या आघाडीवरही भारी पडू शकतो’, असा इशारा कॅनडाचे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल वेन आयर यांनी दिला. चीनच्या या वाढत्या सामर्थ्यामुळे अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय व्यवस्था धोक्यात आल्याचेही जनरल आयर यांनी बजावले.

लष्करी क्षमतेच्या बळावर चीन पाश्‍चात्य देशांच्या आघाडीवर भारी पडेल - कॅनडाच्या लष्करप्रमुखांचा इशाराकॅनडातील संसदेच्या ‘सिनेट कमिटी फॉर नॅशनल सिक्युरिटी ऍण्ड डिफेन्स’समोर झालेल्या सुनावणीत कॅनडाच्या लष्करप्रमुखांनी चीनच्या वाढत्या संरक्षणखर्चावर तीव्र चिंता व्यक्त केली. ‘चीन आपली लष्करी क्षमता वाढविण्यासाठी प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करीत आहे. या गुंतवणुकीच्या जोरावर मिळालेली क्षमता दर्जा व संख्या या दोन्ही बाबतीत पाश्‍चात्य देशांना मागे टाकणारी आहे’, असे लेफ्टनंट जनरल वेन आयर यांनी बजावले. चीनच्या लष्करी सामर्थ्याबाबत इशारा देतानाच त्यांनी चीनच्या विस्तारवादी धोरणावर टीका केली.

लष्करी क्षमतेच्या बळावर चीन पाश्‍चात्य देशांच्या आघाडीवर भारी पडेल - कॅनडाच्या लष्करप्रमुखांचा इशाराचीनची सत्ताधारी राजवट आपल्या इच्छा जबरदस्तीने शेजारी देशांवर लादत असल्याचा आरोप कॅनडाच्या लष्करप्रमुखांनी केला. चीनची वाढती लष्करी क्षमता व धोरणांमुळे अमेरिकेच्या नेतृत्त्वाखाली चालणारी कायद्यावर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था धोक्यात आल्याचा दावाही जनरल आयर यांनी केला. जनरल आयर यांचे हे वक्तव्य कॅनडाच्या चीनविरोधातील आक्रमक धोरणाचे संकेत मानले जातात. गेल्या काही वर्षांपासून कॅनडाने अमेरिकेचे अनुकरण करून चीनविरोधात आक्रमक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. चिनी कंपनी ‘हुवेई’च्या सर्वोच्च अधिकार्‍यांना केलेली अटक, हुवेईवर टाकलेली बंदी, कोरोना साथीच्या मुद्यावर चीनवर केलेली टीका, साऊथ चायना सीमधील नौदलाची तैनाती आणि उघुरवंशियांबाबत घेतलेली भूमिका या गोष्टी त्याला दुजोरा देणार्‍या ठरतात. चीनने कॅनडावर दडपण आणण्याचे प्रयत्न चालविले असतानाही, कॅनडाची चीनविरोधी भूमिका बदलली नसून लष्करप्रमुखांचा इशारा त्याचाच भाग ठरतो.लष्करी क्षमतेच्या बळावर चीन पाश्‍चात्य देशांच्या आघाडीवर भारी पडेल - कॅनडाच्या लष्करप्रमुखांचा इशारा

काही महिन्यांपूर्वी नाटोच्या एका बैठकीतही कॅनडाने चीनच्या कारवायांविरोधात आग्रही भूमिका घेउन टीकास्त्र सोडले होते. तसेच इंडो-पॅसिफिक क्षेत्रात चीनला रोखण्यासाठी विकसित होत असलेल्या क्वाडमध्ये सहभागी होण्यासाठी कॅनडाही उत्सुक असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया यांच्या क्वाड संघटनेचा विस्तार करून क्वाड प्लसची संकल्पना मांडली जात आहे. त्यात कॅनडाही सहभागी होऊ शकतो, असे काही सामरिक विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply