म्यानमारच्या जुंटा राजवटीविरोधातील सशस्त्र संघर्षाची धार वाढली

म्यानमारच्या जुंटा, Myanmar anti-coup resistance grows, attack a police station, Myanmar Economic Bankनेप्यितौे – म्यानमारच्या जुंटा राजवटीकडून लोकशाहीवादी आंदोलकांवर सुरू असलेल्या कारवाईला तीव्र प्रत्युत्तर मिळण्याचे संकेत मिळत आहेत. लष्कराने केलेल्या बंडाला १००हून अधिक दिवस उलटल्यानंतर आता जुंटा राजवटीविरोधातच व्यापक सशस्त्र संघर्ष सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. उत्तर तसेच मध्य म्यानमारमधील अनेक भागांमध्ये स्थानिक पातळीवर छोटे सशस्त्र गट उदयाला येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचवेळी शहरी भागांमधून विद्यार्थी, डॉक्टर्स, सरकारी कर्मचारी, खेळाडू तसेच मॉडेल्सही सशस्त्र संघर्षासाठी तयार होत असल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांकडून देण्यात आले आहे.

म्यानमारच्या जुंटा, Myanmar anti-coup resistance grows, attack a police station, Myanmar Economic Bank

फेब्रुवारी महिन्यात म्यानमारच्या लष्कराने बंड करून सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. लष्कराच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी म्यानमारच्या जनतेने रस्त्यावर उतरून लोकशाहीवादी आंदोलनाला सुरुवात केली होती. लष्कराकडून सुरू असलेल्या क्रूर कारवाया व भीषण अत्याचारांनंतरही म्यानमारच्या जनतेने माघार घेतलेली नाही. जवळपास १०० दिवस उलटून गेल्यानंतरही आंदोलनाची धग कायम असून उलट त्याची व्याप्ती अधिकाधिक वाढताना दिसत आहे. व्याप्ती वाढत असतानाच जुंटा राजवटीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे स्वरुपही बदलू लागल्याचे दिसत आहे.

मार्च महिन्यात म्यानमारमधील आंदोलनाचे नेतृत्त्व करणार्‍या नेत्यांनी लष्कर बळाचा वापर करीत असेल, तर त्याविरोधात जनतेला आपल्या सुरक्षेचा अधिकार असल्याचा इशारा दिला होता. त्यापाठोपाठ गेल्याच महिन्यात म्यानमारच्या लोकशाही राजवटीचा भाग असणारे नेते आणि वांशिक तसेच बंडखोर गटांनी एकत्र येऊन ‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’ची स्थापना केली होती. हे ‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’ जुंटा राजवटीच्या विरोधात समांतर सरकार म्हणून काम करेल, अशी घोषणाही त्यावेळी करण्यात आली होती.

म्यानमारच्या जुंटा, Myanmar anti-coup resistance grows, attack a police station, Myanmar Economic Bankत्यानंतर म्यानमारमधील जनतेच्या सुरक्षेसाठी ‘पीपल्स डिफेन्स फोर्स’ची उभारणी करण्याची घोषणाही करण्यात आली होती. हा फोर्स म्यानमारच्या लष्कराविरोधात उघड सशस्त्र संघर्ष करील, असे संकेतही देण्यात आले होते. या हालचालींनी अस्वस्थ झालेल्या जुंटा राजवटीने ‘नॅशनल युनिटी गव्हर्मेंट’ला दहशतवादी घोषित केले होते. मात्र लष्कराच्या या दबावाला न जुमानता म्यानमारची जनता सशस्त्र संघर्षात सहभागी होण्यासाठी तयारी करीत असल्याचे समोर येऊ लागले आहे.

काही दिवसांपूर्वी म्यानमारमध्ये ‘ब्युटी क्वीन’ म्हणून ओळखण्यात येणार्‍या हतार हतेत या तरुणीने सोशल मीडियावर हातात रायफल घेतलेला फोटो प्रसिद्ध केला. लष्कराविरोधातील क्रांतीसाठी आपण आपले जीवन समर्पित करण्यासाठी तयार असल्याचे तिने या पोस्टमध्ये म्हटले होते. हतारपूर्वी म्यानमारमधील एक प्रसिद्ध खेळाडू फो थौ यानेही आंदोलनात भाग घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. सोशल मीडियावर हजारो तरुणांनी आपण सशस्त्र संघर्षासाठी प्रशिक्षण घेण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे. म्यानमारमधील वांशिक तसेच बंडखोर संघटनांनी प्रशिक्षण देणार्‍या छावण्या सुरू केल्याचेही सांगण्यात येते.

उत्तर तसेच मध्य म्यानमारमध्ये अनेक भागांमध्ये छोटे सशस्त्र बंडखोर गट तयार झाले असून लष्कराबरोबरील चकमकींच्या बातम्याही प्रसिद्ध होत आहेत. ‘म्यानमार नाऊ’ तसेच ‘द इरावद्दी’ या वेबसाईटनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही आठवड्यात म्यानमारी लष्कराचे सुमारे १०० जवान अशा घटनांमध्ये मारले गेले आहेत.

leave a reply