चीनने बँकेच्या बाहेर रणगाडे तैनात केले

झेंगझोऊ – काही दिवसांपूर्वी ‘बँक ऑफ चायना’ने ठेवीदारांना त्यांचाच पैसा देण्याचे नाकारले होते. यानंतर या बँकेच्या बाहेर शेकडो ठेवीदारांनी जोरदार निदर्शने केली होती. चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने बँकेवर कारवाई करण्याऐवजी बुधवारी जनतेच्या विरोधातच सदर बँकेच्या समोर लष्कर व रणगाडे तैनात केले आहेत. याचे व्हिडिओ सोशल मीडियातून समो आल्यामुळे चीनमध्ये ‘तियानमेन स्क्वेअर 2’ची पुनरावृत्ती होणार? अशी भीती जगभरात वर्तविली जात आहे.

china-bank-tanksचीनच्या अर्थव्यवस्थेवरील संकट अधिकाधिक तीव्र होत चालले आहे. 2008 साली अमेरिकेत आलेल्या आर्थिकमंदीसारखे वातावरण सध्या चीनमध्ये निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी ‘एव्हरग्रांडे’पासून सुरू झालेल्या ‘मॉर्गेज क्रायसिस’मध्ये चीनमधील अनेक कंपन्या व बँका अडकत चालल्याचा दावा अमेरिकेतील माध्यमे करीत आहेत. बँकांकडे गुंतवणूकीसाठी पैसा उरलेला नसून त्यांनी जनतेच्या ठेवीच गुंतवणूक म्हणून वापरण्यास सुरुवात केल्याचे उघड झाले आहे.

काही दिवसांपूर्वी शँदोग प्रांतातील हेनान भागात ‘बँक ऑफ चायना’समोर झालेल्या निदर्शनामुळे ही भयंकर बाब उजेडात आली. कम्युनिस्ट पार्टीशी जोडलेल्या या बँकेने जनतेला पैसा देण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच या बँकेने तिजोरीतील जनतेचे पैसे म्हणजे गुंतवणूक असल्याचे जाहीर केले. आपलाच पैसा आपल्याला मिळत नसल्याचे उघड झाल्यामुळे संतापलेल्या चिनी नागरिकांनी बँकेबाहेर जोरदार निदर्शने केली होती. यावेळी जनता आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष भडकल्याच्या बातम्याही आल्या होत्या.

bank-protestचीनच्या कम्युनिस्ट राजवटीने तातडीने याची दखल घेऊन बँकेसमोर लष्कर तैनात केले होते. पण बुधवारी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हेनान भागातील बँकेसमोर रणगाड्यांचा ताफा तैनात केल्याचे समोर आले आहे. याद्वारे चीनची राजवट आपल्याच जनतेला धमकावत असल्याचे स्पष्ट होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे चीनमध्ये तीन दशकांपूर्वीच्या हृदय हेलावून टाकणाऱ्या हत्याकांडाचे पुनरावृत्ती तर होणार नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे.

4 जून 1989 रोजी चीनच्या तियानमेन चौकात लोकशाही आणि स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थींवर कम्युनिस्ट राजवटीने रणगाडे चालवले होते. यामध्ये हजारो जणांचा बळी गेला तर त्याहून अधिक बेपत्ता झाल्याचा दावा केला जातो. बँक ऑफ चायनासमोरील रणगाड्यांची तैनाती पाहिल्यानंतर चीन तियानमेन चौकाची पुनरावृत्ती करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

leave a reply