अमेरिकेच्या शस्त्रास्त्र कंपन्यांवर चीनचे निर्बंध

बीजिंग – तैवानला करण्यात येणार्‍या शस्त्रास्त्रविक्रीच्या मुद्यावरून चीनने अमेरिकेतील दोन आघाडीच्या शस्त्रास्त्र कंपन्यांवर निर्बंधांची घोषणा केली आहे. या कंपन्यांमध्ये ‘रेथॉन टेक्नॉलॉजी’ व ‘लॉकहीड मार्टिन’ यांचा समावेश आहे. चीनने अमेरिकेच्या संरक्षणक्षेत्रातील कंपन्यांविरोधात निर्बंध लादण्याची ही तिसरी वेळ आहे. 

lockheed-martinदोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेने तैवानमध्ये तैनात असलेल्या पॅट्रियट मिसाईल्स सिस्टिमच्या आधुनिकीकरणाला मंजुरी दिली होती. हा करार सुमारे १० कोटी डॉलर्सचा असून पुढील महिन्यापासून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या करारार अमेरिकेच्या ‘रेथॉन टेक्नॉलॉजी’ व ‘लॉकहीड मार्टिन’ या दोन्ही कंपन्यांचा सहभाग आहे. त्यावेळी चीनने अमेरिकेच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

चीन आपले सार्वभौमत्व व सुरक्षा कायम राखण्यासाठी योग्य उपाययोजना करेल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले होते. सोमवारी करण्यात आलेली निर्बंधांची घोषणा त्याचाच भाग ठरतो.‘चीनच्या अँटी फॉरेन सँक्शन्स लॉमधील तरतुदींनुसार रेथॉन व लॉकहीड मार्टिनवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दोन्ही कंपन्या अमेरिकेकडून तैवानला करण्यात येणार्‍या शस्त्रविक्रीत सहभागी आहेत’, अशा शब्दात चीनने अमेरिकी कंपन्यांविरोधातील निर्णयाची माहिती दिली.
यापूर्वी २०२९ व २०२०मध्येही चीनने अमेरिकेच्या संरक्षणक्षेत्रातील कंपन्यांवर निर्बंध लादले होते.

leave a reply