युक्रेन संकटामुळे शेअर बाजारात चिंता – पाच दिवसात १० लाख कोटींचे नुकसान

मुंबई – रशिया-युक्रेनमध्ये वाढलेल्या तणावामुळे शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असून मंगळवारीही मुंबई सेन्सेक्स ३८२ अंकाने कोसळला. राष्ट्रीय शेअर निर्देशांक निफ्टीमध्ये ११४ अंकांची घसरण झाले. सलग पाचव्या सत्रात शेअर बाजारात घसरण झाली असून १६ फेब्रुवारीपासून भारतीय शेअर बाजारात झालेल्या घसरणीमूळे गुंतवणूकदारांचे १० लाख कोटीहून अधिकचे नुकसान झाले आहे. तसेच युक्रेनमध्ये युद्धाचा भडका उडाल्यास काय होईल, याची चिंता गुंतवणुकदारांना लागली आहे.

Shareमुंबई सेन्सेक्सचे एकूण भांडवली मूल्य २५१.७२ लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. सोमवारच्या तुलनेन या भांडवली मूल्यात ५.६७ लाख कोटी रुपयांची घसरण झाली. तर १६ फेब्रुवारी रोजी मुंबई शेअर बाजाराचे भांडवल २६२.१९ लाख कोटी होते. याचा अर्थ गेल्या पाच दिवसात या भांडवली मूल्यात १०.४६ लाख कोटींची घसरण झाली आहे. थोडक्यात इतक्या कोटी रुपयांचे नुकसान गुंतवणूकदारांना सहन करावे लागले आहे.

मंगळवारीही शेअर बाजारात घसरण सुरू होती. सकाळच्या सत्रात बाजारात मोठी घसरण दिसून आली. सकाळी बाजार उघडताच निर्देशांक १ हजारपेक्षा जास्त अंकाने घसरला होता. मात्र त्यानंतर सावरला. त्यामुळे दिवसाखेर मुंबई सेन्सेन्स ३८४ आणि निफ्टी ११४ अंकांच्या घसरणीने बंद झाला. सोमवारच्या तुलनेत दोन्ही निर्देशांकात ०.७ टक्क्यांची घसरण झाली. मात्र गेल्या पाच दिवसात बाजार हजार अंकाने घसरला आहे. युक्रेनमधील दोन प्रांताना रशियाने स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले आहेत. तसेच अमेरिका व पाश्‍चत्य देशांनी निर्बंधांची घोषणा केली आहे.

या सर्व घडामोडीचे मोठे पडसात जागतिक पातळीवर उमटण्याची शक्यता आहे. इंधन तेलाच्या दरात वाढ झाली आहे. तर जगभरातील शेअर बाजारात घसरण सुरू आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात भारतीय बाजारातही परिस्थिती डळमळीत राहिल, अशी भिती व्यक्त करण्यात येते. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता स्पष्ट दिसून येत आहे.

leave a reply