चीनपासून अमेरिका व भारताच्या अस्तित्त्वाला धोका – विख्यात अमेरिकी विश्‍लेषक गॉर्डन चँग

वॉशिंग्टन – ‘कोरोना हे जैविक शस्त्र असो वा नसो, चीन त्याचा जैविक शस्त्रासारखाच वापर करीत आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. कारण ही साथ पसरण्याच्या किमान पाच आठवडे आधी चीनला याची पूर्ण कल्पना होती. ही माहिती चीनने जगाला दिलेली नाही’, अशा नेमक्या शब्दात विख्यात विश्‍लेषक गॉर्डन चँग यांनी चीनवर घणाघाती प्रहार केले. कोरोनाच्या साथीने अमेरिकेत पाच लाख, 88 हजाराहून अधिक बळी घेतले. तरीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची चीनवर कठोर कारवाई करायला तयार नाहीत, ही बाब हताश करणारी ठरते. अमेरिका व भारत या लोकशाहीवादी देशांच्या अस्तित्त्वाला चीनपासून धोका आहे व म्हणूनच त्याच्या विरोधात लोकशाहीवादी देशांनी संघटीत झालेच पाहिजे, असे गॉर्डन चँग यांनी बजावले.

गॉर्डन चँगडबल म्युटंट असलेला कोरोनाचा नवा स्टेन नैसर्गिक कसा काय असू शकतो? असा प्रश्‍न गॉर्डन चँग यांनी ‘द संडे गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत केला. चीनच्या कम्युनिस्ट हुकूशाहीने आत्तापर्यंत नरसंहार घडवून आणलेले आहेत. हा इतिहास लक्षात घेतला तर हा नवा विषाणू चीनच्या राजवटीनेच जाणीवपूर्वक पसरविला, हे मान्य करावे लागेल. यासाठी चीनला जबाबदार धरावेच लागेल, असे चँग पुढे म्हणाले. असे भयंकर अमानवी कृत्य करणार्‍या चीनला रोखायचे कसे? या प्रश्‍नाला गॉर्डन चँग यांनी थेट शब्दात उत्तर दिले आहे. चीनला रोखणे हा आपल्या अस्तित्त्वाचा मुद्दा बनला आहे, असे सांगून याचे महत्त्व चँग यांनी अधोरेखित केले.

चीनच्या भूमीवरून पसरविला जाणारा हा अखेरचा विषाणू नसेल. यानंतरही चीन अशा कारवाया करू शकतो. हे लक्षात घेऊन चीनबरोबरचे व्यापारी संबंध तोडून टाकण्याचा कठोर निर्णय जगभरातील देशांनी घ्यायला हवा. तसेच चीनमधील गुंतवणूकही सर्व देशांनी मागे घ्यावी. तसेच आपल्या देशात असलेली चीनची मालमत्ता जप्त करून टाका आणि चीनबरोबरील तंत्रज्ञान व विज्ञानविषयक सहकार्यही संपुष्टात आणा, असा सल्ला चँग यांनी दिला. याच्या बरोबरीने चीनच्या कम्युनिस्ट हुकूमशाही राजवटीचा अंत करणारी धोरणे जगाने स्वीकारावी, अशी मागणी गॉर्डन चँग यांनी केली आहे.

मात्र चीनबाबत असे कठोर निर्णय घेण्याच्या ऐवजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन चीनबाबत बोटचेपी भूमिका स्वीकारत आहेत. तसे करून राष्ट्राध्यक्ष बायडेन आपल्या कर्तव्यापासून ढळले आहेत, अशी जळजळीत टीका आंतरराष्ट्रीय?ख्यातीच्या या विश्‍लेषकाने केली. सत्तेवर आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी फेब्रुवारी महिन्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्याशी फोनवरून दोन तास चर्चा केली. त्यात कोरोनाचा पुसटसाही उल्लेख केला नाही, ही निराश करणारी बाब ठरते. अमेरिकेत नरसंहार घडविणार्‍या चीनला जाब विचारणार नसाल, तर तुम्हाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहण्याचा अधिकारच नाही, असा मर्मभेदी प्रहार गॉर्डन चँग यांनी केला आहे.

अमेरिका व अमेरिकी जीवनशैली आता सुरक्षित राहिलेली नाही, याच्या असित्त्वाचा धोका निर्माण झालेला आहे. यापुढे अमेरिकेचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्त्व गृहित धरू नका, असा संदेश गॉर्डन चँग यांनी अमेरिकी जनतेला दिला आहे. हा धोका केवळ अमेरिकेपुरता मर्यादित नाही. तर भारतासारखा लोकशाहीवादी देश देखील अशाच धोक्याचा सामना करीत आहे. या दोन्ही लोकशाहीवादी देशांकडे चीन शत्रू म्हणूनच पाहत आहे. चीनला जगात हुकूमशाही व्यवस्था लागू करायची आहे. म्हणूनच भारत व अमेरिकेला संपविणे ही चीनची प्राथमिकता आहे. याच कारणामुळे चीनपासून असलेल्या या धोक्याच्या विरोधात अमेरिका व भारताने एकजूट करावी, असे आवाहन गॉर्डन चँग यांनी केले. एका अभ्यासगटासाठी लिहिलेल्या अहवालात गॉर्डन चँग यांनी चीनला लसीचे तंत्रज्ञान पुरविण्याचा निर्णय?घेऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी आत्तापर्यंतची सर्वात मोठी घोडचूक केलेली आहे, असा शेरा मारला. राष्ट्राध्यक्ष बायडेन हे तंत्रज्ञान चीनच्या पायावर टाकून शरणांगती पत्करत असल्याचा ठपका चँग यांनी या लेखात ठेवला.

leave a reply