चीनकडून जुलै महिन्यात ८० टन सोन्याची खरेदी

जुलै महिन्यात ८० टनबीजिंग – चीनने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात सुरू केली आहे. जून व जुलै महिन्यात चीनने १८० टन सोन्याची आयात केली. जून महिन्यात १०७ टन तर जुलै महिन्यात ८० टन सोने खरेदी केले. जुलै महिन्यातील खरेदी स्वित्झर्लंडकडून करण्यात आली. चीन हा जगातील सर्वात मोठा सोने उत्पादक व आयातदार देश आहे.

कोरोनाचे उद्रेक, ‘रिअल इस्टेट क्रायसिस’ व इतर कारणांमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेत सध्या घसरण चालू आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार व बड्या कंपन्यांनी चीनमधील गुंतवणूक काढून घेत आहेत. आर्थिक संकट टाळण्यासाठी चीनच्या मध्यवर्ती बँकेने दोनदा व्याजदरात कपात केली होती. ही पार्श्वभूमी लक्षात घेता चीनकडून वाढलेली सोन्याची आयात लक्ष वेधून घेते.

२०२१ सालच्या आकडेवारीनुसार, चीनने ३३२ टन सोन्याचे उत्पादन केले होते. एकूण जागतिक उत्पादनाच्या तुलनेत हे प्रमाण ९ टक्के इतके आहे. मात्र चीनमधील सोन्याची मागणी एक हजार टनांहून अधिक असल्याने हा देश मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात करतो. २०२० व २०२१ या वर्षात कोरोना साथीमुळे चीनमधील सोन्याची मागणी काही प्रमाणात घटली होती. मागणीत पुन्हा वाढ होत असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या दोन महिन्यात चीनकडून आयातीत झालेली वाढ त्याला दुजोरा देणारी ठरते

leave a reply