अरबी समुद्रात चीन व पाकिस्तानी नौदलाचा युध्दसराव 

कराची – सारे जग कोरोनाव्हायरसच्या संकटाचा मुकाबला करीत असताना चीन व पाकिस्तानचे नौदल मात्र  युद्ध सरावात गुंतलेले आहे. पाकिस्तानच्या कराची जवळील सागरी क्षेत्रात दोन्ही देशांचा हा युद्ध सराव सुरू आहे. दोन्ही देशांच्या फ्रिगेेेटसनी या सरावात सहभाग घेतल्याचे सांगितले जाते.
चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना कोरोनाव्हायरसने ग्रासले आहे, तरीही या देशांचा प्राधान्यक्रम बदललेला नाही. हे दोन्ही देश आपले लष्करी सहकार्य अधिकाधिक दृढ करण्यासाठी  उत्सुक असल्याचे दिसत आहे. कोरोनाव्हायरसचे संकट देखील  हे सहकार्य रोखू शकणार नाही, असा संदेश या नौदल सरावाद्वारे दिला जात आहे.
चीन आणि पाकिस्तानचे लष्करी सहकार्य भारताच्या सुरक्षेला आव्हान देणारे असल्याचे अनेकवार सिद्ध झाले होते. यावेळीही अरबी समुद्रात सुरू असलेल्या चिनी व पाकिस्तानी नौदलाच्या या युद्धसरावाकडे
बारकाईने लक्ष ठेवणे भारतासाठी आवश्यक ठरते.

leave a reply