‘बायकॉट चायना’ मास्कद्वारे जम्मूमध्ये चीनचा निषेध

Boycott-Chinaश्रीनगर – चिनी लष्कराकडून भारतीय सैनिकांवर हल्ला केल्यामुळे देशभरात चीनविरोधातील तीव्र संताप व्यक्त होत असून चिनी मालाच्या बहिष्काराचे आवाहन करण्यात येत आहे. जम्मूमधील नागरिकांनी देखील चिनी मालावर बहिष्काराचे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. येथे ‘बायकॉट चायना’ मास्क घालून येथील नागरिक चीनचा निषेध करीत आहेत.

लडाखच्‍या गलवान व्‍हॅलीमध्ये चिनी लष्कराच्या हल्ल्यात भारतीय लष्कराच्या कर्नलसह २० जवान शहीद झाले होते. चीनच्या हल्ल्यानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. जम्मू काश्मीरमध्ये देखील चीनच्या हल्ल्याचे पडसाद दिसून आले. देशभरात कोरोनाव्हायरसचा संक्रमणापासून वाचण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने मास्कचा वापर करण्यात येत आहे. जम्मूमधील मास्क बनवणाऱ्या उत्पादकांनी मास्कचा वापर चीनचा विरोध दर्शविण्यासाठी केला आहे.

जम्मूमध्ये ‘बायकॉट मेड इन चायना’ आणि ‘बायकॉट रेड चायना, बाय मेड इन इंडिया’ लिहिलेल्या मास्कची विक्री करण्यात येत असून नागरिकांकडून या मास्कला प्रचंड मोठी मागणी असल्याचे समोर येत आहे. जम्मू मधून चीनचा होत असलेला विरोध महत्वाचा ठरतो.

leave a reply