राष्ट्रकुल देशांवरील ब्रिटनचा प्रभाव संपविण्यासाठी चीनची प्रचंड गुंतवणूक

- चीनच्या ९०० अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणुकीचे ब्रिटनमध्ये पडसाद

राष्ट्रकुलवॉशिंग्टन/बीजिंग/लंडन – चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट राजवट राष्ट्रकुल गटातील देशांवर आपली पकड घट्ट करण्याचा प्रयत्न करीत असून या देशांमध्ये ९०० अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. अमेरिकेतील एका अभ्यासगटाने अहवाल प्रसिद्ध केला असून कॅरिबिअन देश तसेच आफ्रिका खंडातील राष्ट्रकुल सदस्य देशांना लक्ष्य करण्यात आल्याकडे लक्ष वेधले आहे. या अहवालावरून ब्रिटनच्या राजनैतिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, ब्रिटीश सरकार झोपा काढत आहे का? असा संतप्त सवाल माजी अधिकारी तसेच विश्‍लेषकांकडून करण्यात आला आहे.

‘अमेरिकन एन्टरप्राईज इन्स्टिट्यूट’ या अभ्यासगटाने यासंदर्भातील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. चीनच्या राजवटीने राष्ट्रकुल सदस्य देश असणार्‍या ५४ देशांपैकी ४२ देशांना आपल्या शिकारी अर्थनीतिचे लक्ष केल्याचे यात बजावले आहे. यात प्रामुख्याने कॅरिबिअन क्षेत्र तसेच आफ्रिका खंडातील देशांचा समावेश आहे. कॅरिबिअन क्षेत्रातील जमैका, बार्बाडोस, अँटिग्वा ऍण्ड बर्बुडा, बहामा व त्रिनिदाद ऍण्ड टोबॅगो या देशांमध्ये जवळपास १० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक या देशांच्या जीडीपीच्या किमान १० टक्क्यांपासून ते तब्बल ६० टक्क्यांपर्यंत असल्याचे अमेरिकी अभ्यासगटाने म्हटले आहे.

राष्ट्रकुलआफ्रिका खंडातील राष्ट्रकुलचे सदस्य असणार्‍या सिएरा लिओन, युगांडा, मोझांबिक, झांबिया, लेसोथो, कॅमेरुन या देशांमध्येही चीनमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीचा वापर संयुक्त राष्ट्रसंघटनेत समर्थन मिळविण्यासाठी तसेच मोक्याची बंदरे व जागा ताब्यात घेण्यासाठी करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. तैवानच्या मुद्यावर राजनैतिक दडपण आणण्यासाठीही कम्युनिस्ट राजवट गुंतवणुकीचा वापर करीत राष्ट्रकुलअसल्याचे यापूर्वी समोर आले होते. राष्ट्रकुल गटाचा भाग असलेल्या ग्रेनाडा व डॉमिनिकन रिपब्लिक या देशांना तैवानबरोबरील संबंध तोडण्यास भाग पाडले होते. चीनने या दोन्ही देशांमध्ये तीन अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे.

काही महिन्यांपूर्वी चीनने जमैकामधील मोक्याचे बंदर असणार्‍या किंग्स्टन फ्रीपोर्टचा ताबा मिळविला होता. त्यानंतर गेल्याच आठवड्यात चीनने युगांडामधील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार्‍या ‘एन्टेबी एअरपोर्ट’वर कब्जा मिळविल्याचे वृत्तही समोर आले होते. हा घटनाक्रम व अमेरिकी अभ्यासगटाचा अहवाल यावरून ब्रिटनच्या राजनैतिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. ब्रिटनच्या संसद सदस्य बॅरोनेस हेलेना केनेडी यांनी, चीनचे प्रयत्न शीतयुद्धाच्या दिशेने जाणारे असून, त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असे बजावले. चीनकडून होणार्‍या गुंतवणुकीमुळे ब्रिटनचे प्रभावक्षेत्र कमकुवत होत आहे, याकडे केनेडो यांनी लक्ष वेधले.

‘चीन आर्थिक बळाचा वापर करून राष्ट्रकुल सदस्य देशांची शिकार करीत आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ब्रिटनने हालचाली सुरू करायला हव्यात. यासाठी आधीच उशिर झाला आहे’, अशी टीका ब्रिटीश अभ्यासगट ‘हेन्री जॅक्सन सोसायटी’चे संचालक ऍलन मेंडोझा यांनी केली.

leave a reply