चीनच्या विनाशिकांची जपानच्या बेटांजवळून गस्त

- तैवानबाबत जपानचा हस्तक्षेप सहन करणार नसल्याचा चीनचा इशारा

बीजिंग/टोकिओ – तैवान आणि क्षेत्रीय वर्चस्वाप्रकरणी अस्वस्थ बनलेला चीन आपल्या शेजारी देशांना धमकावत आहे. काही दिवसांपूर्वी जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी तैवान हा साऱ्या जगासाठी महत्त्वाचा मुद्दा असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर तैवानजवळच्या आपल्या बेटावर ‘पॅट्रियॉट’ ही क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा तैनात करण्याची घोषणा केली होती. यामुळे खवळलेल्या चीनने थेट तैवान हा आपला सार्वभौम भूभाग असल्याचे सांगून यात जपानचा हस्तक्षेप सहन करणार नसल्याचे धमकावले. त्याचबरोबर चीनने जपानच्या बेटांजवळून आपल्या विनाशिका रवाना करुन इशाराही दिला.

चीनच्या विनाशिकांची जपानच्या बेटांजवळून गस्त - तैवानबाबत जपानचा हस्तक्षेप सहन करणार नसल्याचा चीनचा इशारारशिया-युक्रेन युद्धाकडे जगाचे लक्ष लागले आहे. याचा फायदा घेऊन चीन तैवानवर हल्ला चढवू शकतो, असा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून चीनने तैवानच्या सागरी व हवाई हद्दीजवळील वाढविलेल्या लष्करी हालचालींचे उदाहरण हे विश्लेषक देत आहेत. जपानने देखील तैवानच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. चीनने तैवानवर हल्ला चढविला तर त्यामुळे जपानची सुरक्षा देखील धोक्यात येईल, अशी चिंता जपानने व्यक्त केली होती. टोकिओमध्ये आयोजित जी७च्या बैठकीतही जपान हा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे.

जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांनी ‘निक्केई एशिया’ला दिलेल्या मुलाखतीत तैवानच्या सुरक्षेबाबत चर्चा केली होती. तैवानची सुरक्षा हा फक्त जपानच नाही तर साऱ्या जगासाठी महत्त्वाचा मुद्दा असल्याचे पंतप्रधान किशिदा म्हणाले होते. त्यामुळे तैवानच्या मुद्यावर साऱ्या जगाने भूमिका घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान किशिदा यांनी या मुलाखतीद्वारे केले होते. याच सुमारास जपानच्या संरक्षण मंत्रालयाने मियाको बेटावर ‘पॅट्रियॉट’ ही क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा तैनात करण्याची घोषणा केली होती.

चीनच्या विनाशिकांची जपानच्या बेटांजवळून गस्त - तैवानबाबत जपानचा हस्तक्षेप सहन करणार नसल्याचा चीनचा इशारामियाको बेट हे तैवानपासून अवघ्या ४४६ किलोमीटर अंतरावर आहे. या बेटावरील पॅट्रियॉटची ही तैनाती उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्याविरोधातील तयारी असल्याचे जपानने म्हटले होते. पण तैवान हा चीनचा भूभाग असून जपान आपल्या हद्दीजवळ पॅट्रियॉट तैनात करीत असल्याचा आरोप चीनने केला. त्यामुळे तैवानच्या प्रश्नावर जपानचा हस्तक्षेप अजिबात सहन करणार नसल्याचे चीनच्या मुखपत्राने धमकावले आहे. या धमकीबरोबरच चीनची ‘ल्हासा’ विनाशिका आणि दोन विध्वंसिका जपानच्या बेटांजवळून रवाना केल्याचे जाहीर केले.

जपान आणि दक्षिण कोरियातील सहकार्यामुळे देखील चीनची बेचैनी वाढल्याचे दिसत आहे. चार दिवसांपूर्वी जपानच्या पंतप्रधानांनी दक्षिण कोरियाचा दौरा करुन सहकार्य वाढविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले होते. जपान व दक्षिण कोरियातील या सहकार्याचा उल्लेख करून चीनच्या लष्करी मुखपत्राने ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’ला आपल्या शत्रूविरोधात कारवाईसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले होते.

हिंदी

 

leave a reply