सुदानमधील परिस्थितीमागे इस्रायल आणि अरब देशाचे कारस्थान

- कतारच्या माजी पंतप्रधानांचा आरोप

इस्रायल आणि अरबकाबुल – सुदानमधील सरकारविरोधात लष्कराने पुकारलेले बंड आणि त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी इस्रायल व अरब देश जबाबदार आहेत. कतारचे माजी पंतप्रधान शेख हमाद बिन जसिम अल-थानी यांनी सोशल मीडियावर हा आरोप केला. त्यांचे हे आरोप सोशल मीडियामध्ये उचलून धरले जात आहेत. पण युएईच्या राष्ट्राध्यक्षांचे राजकीय सल्लागार अन्वर गरगाश यांनी माजी पंतप्रधान शेख हमाद यांचे दावे धुडकावले.

तीन आठवड्यांपूर्वी सुदानचे लष्करप्रमुख जनरल अब्देल फताह बुर्‍हान यांनी पंतप्रधान अब्दलाह हम्दोक यांचे सरकार उलथले होते. जनरल बुर्‍हान यांनी पंतप्रधान हम्दोक यांना अज्ञात स्थळी ठेवल्याची माहिती समोर आली होती. आंतरराष्ट्रीय स्तरातून दबाव वाढल्यानंतर, सुदानच्या लष्करप्रमुखांनी पंतप्रधान हम्दोक यांची सुटका केल्याचे जाहीर केले. पण लष्कराने हम्दोक यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप झाला होता.

इस्रायल आणि अरबलोकशाहीनियुक्त सरकार उधळणार्‍या लष्कराविरोधात सुदानच्या नागरिकांनी निदर्शने सुरू केली आहेत. सुदानमधील या परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय स्तरातून चिंता व्यक्त केली जाते. दोन वर्षांपूर्वी हम्दोक आणि लष्कराने एकत्र येऊन सुदानचे तत्कालिन हुकूमशहा ओमर अल बशिर यांची सत्ता उलथली होती. त्यानंतर सुदानमध्ये लोकशाहीवादी सरकारची स्थापना करण्यात आली होती. अशा परिस्थितीत, कतारचे माजी पंतप्रधान शेख हमाद बिन जसिम अल-थानी यांनी सुदानमधील बंड आणि त्यानंतरच्या घडामोडींसाठी इस्रायल व अरब देशाला जबाबदार धरले.

‘सुदानमध्ये जे काही घडले व आत्ता जे काही घडत आहे, ते सारे इस्रायल आणि अरब देशाचे नियोजन, समन्वय आणि सहकार्याचा परिणाम आहे’, असा आरोप माजी पंतप्रधान शेख हमाद यांनी केला. माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळविण्यासाठी आपण ही वस्तूस्थिती उघड इस्रायल आणि अरबकेली नसल्याचा दावा शेख हमाद यांनी केला. यामध्ये शेख हमाद यांनी अरब देशाचे नाव घेण्याचे टाळले. पण त्यांचा रोख युएईकडे असल्याचा दावा केला जातो. शेख हमाद यांच्या या आरोपांना सोशल मीडियावरील विशिष्ट गटाकडून जोरदार समर्थन मिळाले.

यानंतर युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख खलिफा बिन झाएद अल नह्यान यांचे राजकीय सल्लागार अन्वर गरगाश यांनी नाव न घेता कतारच्या माजी पंतप्रधानांचे दावे खोडून काढले. ‘राजकीय पद गमावल्यानंतर आणि देशद्रोह व षडयंत्रामध्ये नाव सापडल्यानंतर, संबंधित व्यक्तीला पुन्हा सरकारमध्ये परतायचे आहे. यासाठी ते वाट्टेल ते आरोप करत सुटले आहेत’, अशी जळजळीत टीका गरगाश यांनी शेख हमाद यांच्यावर केली.

दरम्यान, सुदानचे बडतर्फ पंतप्रधान हम्दोक यांनी काही महिन्यांपूर्वी युएई व बाहरिन यांच्याप्रमाणे इस्रायलबरोबर अब्राहम करार करून सहकार्य प्रस्थापित केले होते. हम्दोक यांचा हा निर्णयच लष्कराच्या बंडाचे कारण ठरल्याचा दावा केला जातो.

leave a reply