देशातील कोरोना रुग्णांची संख्या १५ लाखांवर

नवी दिल्ली – देशातील कोरोना रुग्ण संख्या १५ लाखांवर पोहोचली आहे. तसेच या साथीच्या बळींची संख्या ३३ हजारांच्या पुढे गेली आहे. सोमवारी एका दिवसात देशात ४७ हजार ७०४ पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर चोवीस तासात ६५४ रुग्णांचा मृत्य झाला आहे. रविवार पर्यंत भारतातील कोरोना रुग्णांची संख्या १४ लाख होती. मात्र गेल्या दोन दिवसात भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक लाखांनी वाढली आहे.

१५ लाखांवर

महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटकसह गुजरात, पश्चिम बंगाल राज्यातही कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याने चिंता अधिक वाढल्या आहेत. महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात ७,७१७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २८२ जणांचा बळी गेला आहे. परिणामी महाराष्ट्र कोरोनाचा सर्वाधिक हॉटस्पॉट ठरला असून रुग्णसंख्या ४ लाखांजवळ पोहोचली आहे.

तामिळनाडूत एका दिवसात कोरोनाचे ६,९७२ रुग्ण आढळले आहेत तर ८८ जण दगावले आहेत. या राज्यातील रुग्णसंख्या २,२७,६८८ वर पोहोचली आहे. कर्नाटकात गेल्या चोवीस तासात ५,५३६ रुग्ण सापडले असून १०२ जण दगावले आहेत. येथील रुग्णसंख्या १,०७,००१ वर पोहोचली आहे. आंध्र प्रदेशमध्ये एका दिवसात ७,९४८ रुग्ण मिळाले असून ५८ जणांचा बळी या साथीमुळे गेला आहे. या राज्यातील रुग्णसंख्या १ लाख १० हजारांवर पोहोचली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या लढ्यात भारताचा मित्रदेश फ्रान्सने मदतीचा हात पुढे केला आहे. फ्रान्सने भारताला व्हेंटिलेटर, मेडिकल किटसह अन्य वैद्यकीय साहित्य पाठवले आहे.

भारतात गेल्या तीन दिवसात कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात झाल्याचे हाती मिळालेल्या माहितीनुसार स्पष्ट झाले आहे, मात्र असे असतानाच दुसऱ्या बाजूला भारतात नऊ लाखांपेक्षा अधिक रूग्ण बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.

leave a reply