देशात कोरोनाच्या बळींची संख्या साडेनऊ हजारांवर

नवी दिल्ली – सोमवार सकाळपर्यंतच्या चोवीस तासात झालेले ३२५ मृत्यूंमुळे देशात कोरोनाच्या साथीत दगावलेल्यांची संख्या साडेनऊ हजारांवर पोहोचली. तसेच ११,५०० हून नव्या रुग्णाच्या नोंदीमुळे देशातील या साथीच्या एकूण रुग्णांची संख्या ३,३२,४२४ वर गेली. सोमवारी रात्रीपर्यंत देशातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाख ४० हजारांच्या पुढे गेल्याचे स्पष्ट होते. सोमवारी महाराष्ट्रात तब्बल १७८ जणांचा या साथीने बळी गेला, तर २,७८६ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातील या साथीने दगावलेल्यांची संख्या चार हजारांच्या पुढे पोहोचली आहे.

Coronavirus, India

देशात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असताना या साथीतून बरे होण्याचा दर ५० टक्क्यांच्या वर पोहोचला आहे. महाराष्ट्रातच एका दिवसात पाच हजार रुग्ण बरे झाले राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर ४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर देशात सीमारे एक लाख ७० हजार रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात येत आहेत. कोरोनाच्या चाचण्यासाठी ९०१ प्रयोगशाळा सध्या कार्यरत आहेत. यामध्ये ६५३ सरकारी प्रयोगशाळा आहेत.

कोरोनाच्या रुग्ण संख्येच्या बाबतीत भारत जगात अमेरिका, ब्राझील आणि रशियानंतर चौथ्या स्थानावर असला तरी देशातील लोकसंख्या पाहता प्रति व्यक्ती संक्रमणाच्या बाबतीत भारत १४३ व्या स्थानावर आहे. मात्र मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि अहमदाबाद सारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळत आहेत. या चार शहरातच ५६०० जण या साथीने दगावले असून एक लाख ५० हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत.कोरोनाव्हायरसचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेळ वाढला आहे. मात्र शहरांमधून वाढत असलेले संक्रमण चिंतेचा विषय ठरत असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.

दरम्यान तामिळनाडूत चेन्नई आणि शेजारच्या चार भागांमध्ये लॉकडाऊनचे नियम पुन्हा कडक करण्यात आले. शहरात वाढत्या रुग्णांची संख्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईतही मालाडच्या मालवणी भागात लॉकडाऊन कडक करण्यात आला असून येथे दुकाने २० जून पर्यंत बंद राहणार आहेत. सोमवारी मुंबईत चोवीस तासात५८ जण दगावले, तर १०६६ नव्या रुग्णांची नोंद झाली

leave a reply