इराणमध्ये कोरोनाव्हायरसचा फैलाव अधिकच वाढला

इराणमध्ये कोरोनाव्हायरसचा फैलाव अधिकच वाढला

तेहरान, दि (वृत्तसंस्था) – इराणमध्ये कोरोनाव्हायरसने थैमान घातले असून गेल्या २४ तासात या साथीने १३४ जणांचा बळी घेतला . आतापर्यंत इराणमध्ये कोरोनाव्हायरसने ३,२९४ जण दगावले आहेत. तर इराणच्या संसदेचे सभापती अली लारिजानी यांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.  

गेल्या २४ तासात इराणमध्ये २,७१५ नवे रुग्ण आढळले आहेत. महिनाभराच्या काळात  इराणमधील ही रुग्णांची संख्या ५३ हजारांवर जाऊन पोहोचली. इराणमधला कोरोनाव्हायरसचा वाढता फैलाव पाहता ही साथ पुढच्या वर्षापर्यंत कायम राहील, अशी भिती इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी व्यक्त केली.

गुरुवारी इराणचे संसद सभापती अली लारिजानी यांना या साथीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.  सध्या ते क्वांरटाईनमध्ये आहेत. याआधी इराणचे उपराष्ट्राध्यक्ष, सर्वोच्च धर्मगुरू आयतुल्लाह खामेनी यांचे सल्लागार आणि काही संसद सदस्यांना कोरोनाव्हायरसची लागण झाली होती.  दरम्यान, अमेरिकेच्या निर्बंधामुळे इराणला या संकटाचा सामना करताना अनेक अडचणी येत आहेत.

leave a reply