‘ओपेक प्लस’च्या बैठकीनंतर कच्च्या तेलाच्या दरांमध्ये वाढ कायम

वॉशिंग्टन/रियाध – इंधन उत्पादक देशांच्या ‘ओपेक’ व ‘ओपेक प्लस’ या गटांमध्ये नुकत्याच झालेल्या बैठकीत इंधनपुरवठ्याची मर्यादा कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरांमधील वाढ कायम राहिली असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दराने ८० डॉलर्स प्रति बॅरलचा टप्पा पार केला आहे. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर ८३ डॉलर्सवर तर अमेरिकेतील दर ८० डॉलर्सवर जाऊन पोहोचले आहेत. हे दर म्हणजे २०१४ सालानंतरचा उच्चांक ठरतो.

या वर्षाच्या अखेरपर्यंत कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर्सवर जातील - अमेरिकी विश्‍लेषकाचा दावागेल्या दोन महिन्यात कोरोना साथीच्या संकटातून जागतिक अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे इंधनाची तसेच वीजेची मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. मात्र त्याचवेळी कोळसा, नैसर्गिक इंधनवायू व कच्च्या तेलाचे उत्पादन कमी राहिल्याने दरांमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. जुलै महिन्यात इंधन उत्पादक देशांच्या ‘ओपेक’ व ‘ओपेक प्लस’ या गटांमध्ये झालेल्या बैठकीत इंधनपुरवठा वाढविण्याच्या करारावर एकमत झाले होते.

या करारानुसार, ऑगस्ट महिन्यापासून कच्च्या तेलाचे उत्पादन प्रतिदिन चार लाख बॅरल्सने वाढविण्यात आले आहे. मात्र कच्च्या तेलाची मागणी वेगाने वाढत असून पुरवठा मर्यादित राहिल्याने दरही वाढण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यात, अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने इंधन उत्पादक देशांच्या ‘ओपेक’ गटाला उत्पादन वाढविण्याचे निर्देश दिले होते. पण ओपेकने अमेरिकेची सूचना नाकारली असून आपल्या करारावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.‘ओपेक प्लस’च्या बैठकीनंतर कच्च्या तेलाच्या दरांमध्ये वाढ कायम

शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरांमध्ये १.७ टक्क्यांची वाढ झाली असून दर ८३.३२ डॉलर्स प्रति बॅरलवर गेले आहेत. त्याचवेळी अमेरिकेतील ‘वेस्ट टेक्सास क्रूड फ्युचर्स’मध्येही दरांनी दोन टक्क्यांहून अधिक उसळी घेत ८० डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. हे दर गेल्या सात वर्षातील उच्चांक असल्याचे सांगण्यात येते. या वर्षातच तेलाच्या दरांमध्ये ६० टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कच्च्या तेलातील दरांच्या उसळीनंतर प्रमुख वित्तसंस्था व विश्‍लेषकांनी पुन्हा एकदा तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅरलचा टप्पा ओलांडू शकतो, असे भाकित वर्तविले आहे. बँक ऑफ अमेरिका ग्लोबल रिसर्चने यासंदर्भात दावा केला आहे. तर गोल्डमन सॅक्सने वर्षअखेरपर्यंत कच्च्या तेलाचे दर ९० डॉलर्सच्या वर राहतील, असे म्हंटले आहे.

leave a reply