न्हावाशेवात तेलाच्या पिंपांमधून १२५ कोटींचे ड्रग्ज जप्त

मुंबई – न्हावाशेवातील बंदरातून डायरोक्टरेट ऑफ रिव्हेन्यु इंटिलिजन्सच्या (डीआरआय) अधिकार्‍यांनी मोठी कारवाई करीत १२५ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. हे हेरॉईन आयात करण्यात आलेल्या खाद्यतेलाच्या पिंपामध्ये तळाशी लपविण्यात आले होते. पहिल्यांदाच कोणत्याही भारतीय तपास संस्थेने तेलाच्या कॅनमध्ये अशापद्धतीने लपविलेले अमली पदार्थ जप्त केले आहेत. अशाप्रकारच्या आयात मालातून अशी तस्करी पकडणे अशक्यप्राय गोष्ट असते, असे डीआरआयने म्हटले आहे. जुलै महिन्यात डीआरआयने न्हावाशेवा बंदरातच ३०० किलो हेरॉईन जप्त केले होते.

न्हावाशेवात तेलाच्या पिंपांमधून १२५ कोटींचे ड्रग्ज जप्तन्हावाशेवा बंदरात उतरविण्यात आलेल्या आयात मालातून मोठ्या प्रमाणावर हेरॉईनची तस्करी करण्यात आल्याची गोपनिय माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानंतर डीआरआयने या माहितीची छाननी करून मंगळवारी ५ ऑक्टोबरला डीआरआयच्या मुंबईत विभागाच्या पथकाने धाड टाकून संशयित आयात मालाची तपासणी सुरू केली. या तपासणीदरम्यान इराणमधून आयात कारण्यात आलेल्या खाद्यतेलाच्या पिंपामध्ये तळाशी लपवून ठेवलेले २५.४५ कीलो हेरॉईन जप्त केले. या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे १२५ कोटी रुपये आहे.

सीमाशुल्क संबंधित कागदपत्रात कंटेनरमध्ये तीळ तेल आणि मोहरीचे तेल म्हणून माल असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र मोहरी तेलाच्या पाच पिंपात तळाशी हे अमली पदार्थ लपविण्यात आले होते. पहिल्यांदाच अमली पदार्थांच्या तस्करीसाठी तस्करांनी अशी कार्यपद्धती वापरल्याचे डीआरआयने म्हटले आहे.

या प्रकरणात एका व्यावसायिकाला डीआरआयने ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. हा व्यावसायिक बरीच वर्ष इराणमध्ये रहायला होता. हे हेरॉईन त्याने अफगाणिस्तानातून मागविल्याचे, यासाठी त्याने आपल्या इराणमधील जुन्या ओळखीचा वापर केल्याचे कबूल केले आहे. न्हावाशेवात तेलाच्या पिंपांमधून १२५ कोटींचे ड्रग्ज जप्तयाआधी जुलै महिन्यात न्हावाशेवा बंदरात सुमारे ३०० किलो हेरॉईन जप्त करण्यात आले होते. या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे १५०० कोटी रुपये होती. हे हेरॉईन अफगाणिस्तानातून इराणमार्गे टॅल्कम पावडरच्या आयातीच्या आडून तस्करीत करण्यात आले होते. याआधी गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यातही न्हावाशेवा बंदरात १९१ कीलो हेरॉईनचा साठा जप्त करण्यात आला होता. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे ९०० कोटी रुपये होती. गेल्यावर्षभरात डीआरआयच्या मुंबई युनिटने अफगाणिस्तानातून आयात करण्यात आलेल्या व इराणमधील बंदरामार्गे भारतात आलेल्या मालातून अशाप्रकारच्या तस्करीच्या डझनभर तरी घटना उघड केल्या आहेत. याशिवाय आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतून आलेल्या प्रवाशांच्या सामानातूनही काही किलो अमली पदार्थ डीआरआयने जप्त केले आहेत.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील डोंगरी भागातूनही १५ कोटींचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विभागाने ही कारवाई केली होती. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या मुंद्रा पोर्टमध्येही अफगाणिस्तानातून आयात करण्यात आलेल्या सामानाच्या आडून १५ हजार कोटींच्या अमली पदार्थ तस्करीचे प्रकरण उघड झाले होते.

leave a reply