कच्च्या तेलाचे दर १५० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत कडाडतील

- ‘जेपी मॉर्गन’चा इशारा

वॉशिंग्टन – कच्च्या तेलाचे दर वाढत असताना मागणीप्रमाणे योग्य पुरवठा करण्याची पुरेशी क्षमता ‘ओपेक’ व संलग्न गटातील देशांकडे नाही. त्यामुळे पुढील दोन वर्षात कच्च्या तेलाचे दर प्रतिबॅरल १५० डॉलर्सपर्यंत कडाडू शकतात, असा इशारा आंतरराष्ट्रीय वित्तसंस्था ‘जेपी मॉर्गन’च्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिला. कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटच्या धसक्याने सध्या कच्च्या तेलाचे दर ७० डॉलर्स व त्याखाली येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर जेपी मॉर्गनचा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

कच्च्या तेलाचे दर १५० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत कडाडतील - ‘जेपी मॉर्गन’चा इशारा‘ओपेक सदस्य देशांकडे जमिनीखाली तेलाचे खूप साठे आहेत. पण त्याचे उत्खनन करून झटपट पुरवठा वाढविण्यासाठी आवश्यक असलेले भांडवल व इतर तंत्रज्ञान त्यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांच्याकडील साठे म्हणजे एक मृगजळ आहे’, असा दावा ‘जेपी मॉर्गन’च्या ‘ऑईल ऍण्ड गॅस रिसर्च’ विभागाचे प्रमुख ख्रिस्तियन मॅलेक यांनी केला. तेलाचे दर नियंत्रणाबाहेर गेल्यास बाजारपेठेत तातडीने अतिरिक्त साठा उपलब्ध करून देण्याची ओपेकची क्षमता कमी आहे, याकडे मॅलेक यांनी लक्ष वेधले आहे.

त्यामुळे २०२२ साली कच्च्या तेलाचे दर १२५ डॉलर्स प्रतिबॅरल तर २०२३ मध्ये १५० डॉलर्स प्रतिबॅरलपर्यंत कडाडू शकतात, असा इशारा मॅलेक यांनी दिला. कोरोनाच्या साथीमुळे मागणी कमी झाली तर ओपेक व संलग्न देश पुरवठ्यात कपात करतील, असा दावाही त्यांनी केला. कच्च्या तेलाचे दर १५० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत कडाडतील - ‘जेपी मॉर्गन’चा इशाराकच्च्या तेलाच्या दरांमध्ये वाढीबाबत गेल्या दोन आठवड्यात देण्यात आलेला हा दुसरा मोठा इशारा ठरला आहे. दोन आठवड्यांपूर्वी जगातील आघाडीच्या इंधनकंपन्यांपैकी एक म्हणून ओळख असणार्‍या ‘रोझनेफ्ट’ने कच्च्या तेलाच्या दरांमध्ये होणार्‍या वाढीचे भाकित वर्तविले होते.

कच्च्या तेलाचे दर २०२२ सालच्या दुसर्‍या सहामाहीत १२० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत उसळू शकतात’, असे रोझनेफ्टचे उपाध्यक्ष ओटाबोक करिमोव्ह यांनी बजावले होते. त्यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन करताना, कमी गुंतवणूक तसेच उत्पादनवाढीची शक्यता नसल्याने दर वाढतील असे म्हटले होते. गेल्या महिन्यात कच्च्या तेलाच्या दरांनी ८६ डॉलर्स प्रतिबॅरलचा उच्चांक गाठला होता. सध्या कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिअंटच्या भीतीने तेलाचे दर ७० डॉलर्सपर्यंत खाली आले आहेत.

leave a reply