संरक्षणमंत्र्याकडून डीआरडीओच्या ‘मोबाईल लॅब’चे उद्‌घाटन

नवी दिल्ली – कोरोनाव्हायरसची साथ फैलावत असताना, ‘संरक्षण संशोधन विकास संस्था’ने (डीआरडीओ) ‘मोबाईल व्हायरॉलॉजी अँन्ड डायग्नोस्टिक लॅब’ विकसित केली. गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते याचे उद्‌घाटन पार पडले. डीआरडीओने हैदराबादच्या ईएसआयसी हॉस्पिटल आणि एका खाजगी कंपनीच्या सहाय्याने ही लॅब विकसित केली आहे. या मोबाईल लॅबमध्ये दिवसभरात हजार चाचण्या होऊ शकतात.

गुरुवारी व्हिडीओ कॉ्न्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संरक्षणराज्य मंत्री जी.किशन रेड्डी आणि डीआरडीओचे अध्यक्ष उपस्थित होते. अशाप्रकारची मोबाईल लॅब विकसित करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागतो. पण डीआरडीओने ही लॅब अवघ्या दोन आठवड्यात विकसित केल्याचे सांगून संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी यावर समाधान व्यक्त केले. शिवाय डीआरडीओची ही लॅब जागतिक आरोग्य संघटना आणि इंडियन कौन्सिल मेडिकल रिसर्चचे सर्व निकष पूर्ण करणारी आहे.

 

 

 

 

 

 

डीआरडीओने विकसित केलेली ही मोबाईल लॅब कुठेही नेता येईल. ही लॅब कोरोनाव्हायरसच्या संशोधन आणि चाचण्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. सध्या या लॅबमध्ये दिवसाला हजार चाचण्यांची क्षमता असली तरी पुढच्या काळात ही क्षमता दोन हजारांवर जाऊ शकते. ही लॅब कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी सक्षम ठरेल, असा विश्वास संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केला.

डीआरडीओने अल्पावधीतच व्‍हेंटिलेटर्स तयार करण्याची क्षमता विकसित करुन ते भारतातल्या खाजगी कंपन्यांना पुरविले होते. तसेच पीपीई किट्स देखील डीआरडीओने विकसित केले असून कोरोनाविरोधी या युध्दात डीआरडीओने अत्यंत महत्त्वाची भूमिका पर पडली होती. यावेळी संरक्षणमंत्र्यानी डीआरडीओ तसेच भारतीय लष्कराने या अंत्यत अवघड काळात केलेल्या सहाय्याची प्रशंसा केली आहे.

leave a reply