बायडेन प्रशासनाचा बीजिंग ऑलिंपिकवरील ‘डिप्लोमॅटिक बॉयकॉट’ म्हणजे थट्टा

- अमेरिकेच्या विरोधी पक्षनेत्या निक्की हॅले

थट्टावॉशिंग्टन/बीजिंग – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सोमवारी चीनमध्ये होणार्‍या ‘विंटर ऑलिंपिक्स’वर राजनैतिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला. बायडेन यांच्या या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडले असून हा बहिष्कार म्हणजे थट्टा असल्याचा टोला संयुक्त राष्ट्रसंघटनेतील माजी दूत निक्की हॅले यांनी लगावला आहे. अमेरिकेने केलेल्या या घोषणेपूर्वीच युरोपमधील लिथुआनियानेही बीजिंग विंटर ऑलिंपिक्सवर राजनैतिक बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. लिथुआनियासारख्या देशाच्या पुढे जाऊन चीनला दुखावण्याचा निर्णय बायडेन प्रशासनाने घेतलेला नाही. याचे पडसाद अमेरिकेत उमटत आहेत.

चीनची राजधानी बीजिंगमध्ये पुढील वर्षी ‘विंटर ऑलिंपिक्स’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांवर कोरोनाच्या साथीचे सावट असले, तरी चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने स्पर्धांसाठी जय्यत व भव्यदिव्य तयारी सुरू केली आहे. कोरोनाच्या साथीसह हॉंगकॉंग, तैवान, साऊथ थट्टाचायना सी व तिबेटमधील कारवाया यामुळे चीनची आंतरराष्ट्रीय प्रतिमा डागाळली आहे. त्याचवेळी झिंजिआंग प्रांतातील उघूरवंशियांच्या वंशसंहाराच्या आरोपांनी कम्युनिस्ट राजवट चांगलीच अडचणीत आली आहे. या पार्श्‍वभूमीवर स्पर्धांच्या माध्यमातून आपल्याला होणारा विरोध तसेच टीकेची धार कमी करून प्रतिमा सुधारण्याचा चीनचा प्रयत्न आहे.

मात्र पाश्‍चात्य देशांनी उघूरवंशियांच्या वंशसंहाराच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली असून ऑलिंपिंकवर राजनैतिक बहिष्कार टाकण्याचे संकेत दिले होते. काही देशांनी यासंदर्भातील ठरावही मंजूर केले होते. या मुद्यावर अमेरिका नक्की काय भूमिका घेते याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष होते. सोमवारी रात्री राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी बीजिंग विंटर ऑलिंपिक्सवर राजनैतिक बहिष्कार टाकत असल्याचा निर्णय जाहीर केला. झिंजिआंगमधील वंशसंहार व मानवाधिकारांचे उल्लंघन या मुद्यांवरून बहिष्कार टाकण्यात येत असल्याची माहिती व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी दिली.

थट्टामात्र बायडेन यांच्या या निर्णयावर अमेरिकेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. संयुक्त राष्ट्रसंघटनेतील अमेरिकेच्या माजी दूत व रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निक्की हॅले यांनी, राजनैतिक बहिष्काराचा निर्णय म्हणजे मोठा विनोद असल्याचे बजावले. ‘बायडेन व त्यांच्या सरकारचे प्रतिनिधी या स्पर्धेसाठी आले नाहीत, तरी त्याने चीनला काहीही फरक पडत नाही. त्यांना आपले खेळाडू हवे आहेत’, असे टीकास्त्र हॅले यांनी सोडले. अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनीही, राजनैतिक बहिष्काराला चीनची सत्ताधारी राजवट काडीचीही किंमत देत नाही, असे टीकास्त्र सोडले आहे. बायडेन यांनी कम्युनिस्ट राजवटीविरोधात ठाम भूमिका घ्यायला हवी, अशी मागणी पॉम्पिओ यांनी केली आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या बहिष्काराच्या घोषणेवर चीनने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राजनैतिक माध्यमांमधून तीव्र निषेध नोंदवितानाच या निर्णयाची किंमत मोजण्याची तयारी अमेरिकेने ठेवावी, असा इशारा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी दिला.

leave a reply