डीआरडीओकडून सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘निर्भय’ची चाचणी

बालासोर – हजार किलोमीटर दूरवर मारा करू शकणार्‍या अण्वस्त्रवाहू सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘निर्भय’ची गुरुवारी चाचणी घेण्यात आली. यामुळे या क्षेत्रणास्त्रांच्या भारतीय संरक्षणदलांमध्ये औपचारिक समावेशाचा मार्ग खुला झाला आहे. गेल्या ऑक्टोबर महिन्यात या क्षेपणास्त्राची चाचणी पार पडणार होती. मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे अचानक ही चाचणी थांबविण्यात आली. त्यानंतर आठ महिन्याने निर्भय क्षेपाणास्त्राची चाचणी डीआरडीओकडून घेण्यात आली. या क्षेपणास्त्रांचा औपचारीकरित्या अद्याप संरक्षणदलांमध्ये समावेश झाला नसला, तरी ही क्षेपणास्त्रे गेल्यावर्षीच चीन सीमेवर तैनात करण्यात आली आहेत.

डीआरडीओकडून सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘निर्भय’ची चाचणीसंपूर्ण भारतीय बनावटीच्या आणि उपग्रह आधारीत दळणवळण यंत्रणेशी जोडल्याने अचूक मारा करू शकणार्‍या ‘निर्भय’ क्रूझ क्षेपणास्त्राची संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) चाचणी घेतली. ओडिशाच्या बालासोर येथे सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी ही चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र 08 मॅक स्पीड इतक्या वेगाने मारा करण्यास सक्षम असून अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. हे सबसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र कमी उंचीवरूनही प्रवास करू शकते, त्यामुळे शत्रूच्या रडारला चकमा देण्याची ताकद या क्षेपणास्त्रांमध्ये आहे.

2013 पासून आतापर्यंत या क्षेपणास्त्राच्या कित्येक चाचण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी हे क्षेपणास्त्र औपचारिकरित्या लष्कर आणि नौदलाच्या ताफ्यामध्ये समील करून घेण्यात येणार होते. मात्र 2020 च्या ऑक्टोबरमध्ये आयोजित चाचणीदरम्यान काही तांत्रिक बिघाडामुळे अचानक ही चाचणी थांबविण्यात आली होती. या क्षेपणास्त्राच्या पुढील चाचणीनंतर ‘निर्भय’ क्षेपणास्त्र संरक्षणदलात सामील करून घेतले जाईल, अशा बातम्या होत्या.

याआधीच संरक्षण मंत्रालयाने या क्षेपणास्त्राच्या भारतीय संरक्षणदलात औपचारीक समावेशाला मंजुरी दिलेली आहे. तसेच गेल्यावर्षी लडाखच्या एलएसीवर चीनबरोबरील तणाव वाढल्यावर या औपचारिक समावेशाआधीच काही क्षेपणास्त्रे एलएसीवर तैनात करण्यात आलेली आहेत.

leave a reply