‘व्हीएल-एसआरसॅम’ क्षेपणास्त्राची डीआरडीओकडून चाचणी

- नौदलात लवकरात लवकर दाखल करून घेण्याचा प्रयत्न

बालासोर – मंगळवारी भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओने) नौदलासाठी विकसित केलेल्या ‘व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल’ची (व्हीएल-एसआरसॅम) चाचणी घेतली.

‘व्हीएल-एसआरसॅम’ क्षेपणास्त्राची डीआरडीओकडून चाचणी - नौदलात लवकरात लवकर दाखल करून घेण्याचा प्रयत्ननौदलाच्या युद्धनौकांना हवाई धोक्यांपासून संरक्षणासाठी जलदरित्या हवेतील लक्ष्य भेदणारे हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे. ‘व्हीएल-एसआरसॅम’ लवकरात लवकर नौदलाच्या ताफ्यात दाखल करून घेण्याचे प्रयत्न आहे. या पार्श्‍वभूमीवर या चाचणीचे महत्त्व वाढते. नौदलाच्या आवश्यकतेनुसार डीआरडीओने ‘व्हीएल-एसआरसॅम’ क्षेपणास्त्र विकसित केले आहे. हवेत ५० ते ६० किलोमीटरवरील लक्ष्याचा भेद घेण्यास सक्षम असलेले हे क्षेपणास्त्र येत्या काळात नौदलाच्या भात्यातील प्रभावी अस्त्र ठरू शकते. त्यामुळे नौदलांच्या जहाजांना हवाई धोक्यांपासून संरक्षण पुरविणारी यंत्रणाही अधिक बळकट होईल, असा दावा संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

‘व्हीएल-एसआरसॅम’ क्षेपणास्त्राची डीआरडीओकडून चाचणी - नौदलात लवकरात लवकर दाखल करून घेण्याचा प्रयत्नफेब्रुवारी महिन्यात ‘व्हीएल-एसआरसॅम’ची पहिली चाचणी पार पडली होती. तर मंगळवारी पार पडलेली चाचणी दुसरी चाचणी ठरली आहे. ओडिशातील चांदीपूर येथील डीआरडीओच्या परिक्षण तळावरून दुपारी ३ वाजून ०८ मिनिटांनी ही चाचणी पार पडली. यावेळी नौदलाचे वरीष्ठ अधिकारही उपस्थित होते. क्षेपणास्त्राची विशिष्ट क्षमता तपासण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली होती आणि अपेक्षेप्रमाणे निकाल मिळाल्याचे डीआरडीओ व नौदलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. ‘व्हीएल-एसआरसॅम’ची पुढील चाचणी युद्घनौकेतून घेण्यात येणार आहे.

चाचणीपूर्वी चांदीपूर येथील प्रक्षेपणतळाच्या अडीच किलोमीटर क्षेत्रातील ४५०० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.

leave a reply