इराकमधील स्फोटात चार जणांचा बळी

बगदाद – मंगळवारी सकाळी दक्षिण इराकमधील बसरा शहरात दहशतवाद्यांनी घडविलेल्या बॉम्बस्फोटात चार जणांचा बळी गेला. बाईकवर स्फोटके पेरून दहशतवाद्यांनी हा स्फोट घडविल्याचा दावा केला जातो. गेल्या काही दिवसांपासून इराकमध्ये नव्याने पुन्हा जोर पकडत असलेले ‘आयएस’चे दहशतवादी यामागे असल्याचा संशय व्यक्त केला जातो.

इराकमधील स्फोटात चार जणांचा बळी‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी इराकमधील लष्कर तसेच अल्पसंख्यांकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. इराकच्या उत्तरेकडील कुर्दांवर ‘आयएस’ने हल्ले चढविले होते. तर मंगळवारी शियापंथियांची बहुसंख्या असलेल्या बसरामध्ये स्फोट घडविला. आयएसच्या हल्ल्यांमध्ये होणारी वाढ चिंताजनक असल्याचे कुर्द गटांनी म्हटले आहे.

दरम्यान, सोमवारी इराकच्या लष्कराने अन्बर प्रांतातील आयएसच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढविले. या हल्ल्यात आयएसचे सहा दहशतवादी ठार झाल्याचे इराकी लष्कराने म्हटले आहे. याचा सूड घेण्यासाठी आयएसने बसरामध्ये बॉम्बस्फोट घडविल्याची शक्यता वर्तविण्यात येते. अमेरिकेचे बायडेन प्रशासन इराकमधून सैन्यमाघारीचा विचार करीत असताना, आयएसच्या दहशतवाद्यांचे इराकमधील वाढते हल्ले चिंताजनक बाब ठरत आहे.

leave a reply