मिझोराममध्ये भूकंपाचे धक्के

Earthquake-Mizhoramऐजवाल – ईशान्य भारतातील मिझोरामसह बांगलादेशला भूकंपाचे धक्के बसले. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही. पण मिझोराममध्ये काही घरांची पडझड झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोरामला सर्वोतोपरी सहाय्य केले जाईल, असे आश्वासन दिले. गेल्या काही दिवसात दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि जम्मू- काश्मीरला भूंकपाचे हादरे बसले होते.

रविवारी संध्याकाळच्या सुमारास मिझोरामला ५.१ रिश्टर स्केलचा भूंकपाचा धक्का बसला. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी मिझोराम ५.३ रिश्टर स्केलनेच्या भूकंपाने हादरले. आसाम,मेघालय आणि मणिपूरमध्येही हे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू भारत म्यानमारच्या सीमेवरील चंपाई जिल्ह्यातील झोखावथार येथे होता. भूकंपाच्या धक्क्याने मिझोराममधल्या काही घरांची पडझड झाली. रस्त्याला भेगा पडल्या. यानंतर मिझोरामच्या सरकारकडून तातडीने मदतकार्य हाती घेण्यात आले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी मिझोरामला सर्वोतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले.

Earthquake-Mizhoramशेजारच्या बांगलादेशलाही भूकंपाचा धक्के बसले आहेत. काही दिवसांपूर्वी भारतातील दिल्ली, हरियाणा, गुजरात आणि जम्मू- काश्मीर भूकंपाने हादरले होते. जम्मू आणि काश्मीरमध्ये सलग तीन दिवस भूकंपाचे हादरे बसले होते. जम्मू आणि काश्मीरच्या भूकंपाचा केंद्रबिंदू ताजिकिस्तान होता. गेल्या आठवड्यात २४ तासात जगभरात १४७ भूकंप झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. शुक्रवारी न्यूझीलंडला ७.४ रिश्टर स्केल इतका भूकंपाचा हादरा बसला होता. त्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता.

leave a reply